अभिमानास्पद! 'या' व्यक्तीवर होणार भारतातील कोरोना लसीचे पहिले परिक्षण; जाणून घ्या प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 12:09 PM2020-07-08T12:09:01+5:302020-07-08T14:46:41+5:30

भारतात १५ ऑगस्टला कोरोना व्हायरसची लस लॉन्च केली जाणार आहे. आयसीएमआर आणि हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनी मिळून ही लस तयार करणार आहे. सध्या या लसीचे मानवी परिक्षण सुरू आहे. त्यासाठी देशभरातील १२ संस्थानांची निवड करण्यात आली आहे. ज्यांची मानवी परिक्षणासाठी निवड करण्याात आली आहे.

त्यापैकी एकाचे नाव चिरंजीत धीबर आहे. या गृहस्थांनी लसीची चाचणी स्वतःवर परवनगी दिली आहे. आयसीएमआरच्या भुवनेश्वर केंद्रात हे मानवी परिक्षण केले जाणार आहे. चिरंजीत धीबर नक्की कोण आहेत. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चिरंजीत पश्चिम बंगालच्या दुर्गापूरमधील एका शाळेत शिक्षक आहेत. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य सुद्धा आहेत. त्यांनी सांगितले की ''देशासाठी काही करण्यासाठी मी हे पाऊल उचलत आहे. जीवघेणी माहामारी देशात पसरलेली असताना कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी मला योगदान देण्याची संधी मिळाली आहे. सुरुवातीला मला कुटुंबियांकडून खूप विरोध झाला. पण नंतर त्यांना मी समजावले. ''

चिरंजीत धीबर त्यांच्या वडिलांनी सांगितले की, ''आमच्या सध्या खूप भीती आहे. कारण अशा स्थितीचा सामना आम्ही कधीही केलेला नाही. आम्हाला आशा आहे की, मानवी परिक्षण यशस्वी झाल्यास कोरोनाची लस लवकराच लवकर उपलब्ध होईल.''

मानवी परिक्षणातील सगळ्यात खास गोष्ट अशी की, या लसीच्या चाचणीसाठी स्वच्छेने पुढे येत असलेल्या लोकांनाच समिल करून घेण्यात आले आहे. चाचणीसाठी मानसिकदृष्या तयार असलेल्या लोकांचा समावेश परिक्षणात आहे.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार मानवी परिक्षणासाठी नागपूमधील गिल्लुर्कर मल्टी-स्पेशिएलिटी हॉस्पिटल चंद्रशेखर गिल्लुरकर यांना निवडण्यात आले आहे. सुरूवातीला १०० शंभर लोकांना ही लस दिल्यानंतर तपासणी केली जाईल.

जर त्या लोकांवर कोणतेही साईड इफेक्ट्स झाले नाही तर पुढील चाचणीचे परिक्षण केले जाईल. पहिल्या यशस्वी टप्प्यानंतर १४ व्या दिवशी लोकांना लस दिली जाणार आहे. या लोकांमध्ये कोणत्या एंटीबॉडीज् विकसित होतात का हे पाहिले जाईल. त्यानंतर २८ व्या आणि ५० व्या दिवशी परत चाचणी केली जाणार आहे.

डॉ. गिल्लुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी परिक्षणासाठी निरोगी आणि १८ ते ५५ वयोगटातील लोकांनी निवडण्यात येणार आहे.