CoronaVirus : hiding in these everyday objects in your household | रोजच्या वापरातील 'या' वस्तूंमुळे होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या बचावाचे उपाय

रोजच्या वापरातील 'या' वस्तूंमुळे होऊ शकतं कोरोनाचं संक्रमण; जाणून घ्या बचावाचे उपाय

सध्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसून येत आहे. जगभरात कोरोनाच्या रुग्णांनी हाहाकार पसरवला आहे. सोशल डिस्टेंसिंगचं पालन आणि स्वच्छतेच्या नियमांना लक्षात घेणं गरजेचं आहे.  जगभरातील विविध आरोग्य संस्था कोरोना व्हायरसच्या लसीच्या अंतीम टप्प्यातील परिक्षणात पोहोचल्या आहेत. कोरोना काळात वावरत असताना संसर्गापासून लांब राहण्यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.  

जर्नल एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार कोरोना व्हायरसच्या ४५ टक्के केसेस या लक्षणं न दिसत असलेल्या असू शकतात. त्यामुळे व्हायरसच्या प्रसाराला नियंत्रणात ठेवणं आवाहानात्मक असते. या अभ्यासात दिलेल्या माहितीनुसार कोविड १९ ची लक्षणं दिसत नसलेले व्यक्ती १४ दिवसांपेक्षा जास्त दिवस संक्रमित राहिल्यास  व्हायरसचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो. 

घराची साफसफाई

लक्षण दिसत नसलेल्या रुग्णांच्या शरीरातून व्हायरसचा प्रसार सहजतेने होतो. घरगुती वस्तूंना संक्रमित केल्यामुळे संक्रमण वेगाने पसरतं. त्यासाठी कोविड19 चा हॉटस्पॉट बनण्यााआधी माहिती घेणं गरजेचं आहे.  त्यासाठी घरातील मोकळ्या जागेची सतत सफसफाई करणं गरजेचं आहे.  नळ, टॅबटेल, सिंक, सोफा,  फरशी निर्जंतुक  करायला हवी. अमेरिकन सोसाइटी फॉर माइक्रोबायोलॉजीद्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार कोरोना रुग्णांची खोली ही सगळयात जास्त संक्रमण पसरण्याचं कारण ठरू शकते.

त्यासाठी बेडशिट, उशांचे कव्हर, रुग्णांची खोली रोज दिवसातून दोनवेळा साफ करायला हवी. बाहेरून घरात आल्यानंतर कपडे लगेचच धुवायला टाका. शुज, चपला यांवर सॅनिटायजर स्प्रे मारा. शक्य असल्यास आलटून पालटून चपला वापरा आणि रोज धुवायला टाका. 

अशी घ्या काळजी

सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. साधी सर्दी असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो. त्यामुळे तुम्ही सतत आजारी पडण्यापासून वाचाल.

रोज व्यायाम किंवा योगा करा. योगामुळे श्वासोच्छवास योग्य पद्धतीने घेतला जातो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण गतिमान होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. त्यामुळे तुम्ही विषाणूंपासून लांब राहू शकता. तसंच नियमित योगा केल्याने मानसिक ताण तणाव कमी होण्यास मदत होते.

 चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं बारीक करून घ्या आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं. त्यामुळे घश्याला शेक मिळून तुमची सर्दी, खोकल्याची समस्या कमी होऊ शकते. याशिवाय १५ दिवस आवळ्यांचा रस नियमित प्यायल्यास शिंका येण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केले जात आहे. अनलॉक करण्यात आले याचा अर्थ कोरोनाचा धोका टळला असा अजिबात नाही. कोरोना व्हायरसचं संक्रमण अजुनही वेगाने लोकांना होत आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर जाताना मास्कचा वापर करायला हवा. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास मास्कमुळे तुमची सुरक्षा होऊ शकते.

कोरोनाच्या भीतीने लोक सतत तपासत आहेत शरीराचं तापमान; जाणून घ्या योग्य पद्धत

हवेतून कोरोनाचं संक्रमण पसरतं; तज्ज्ञांच्या 'या' दाव्याबाबत WHO ने दिलं स्पष्टीकरण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : hiding in these everyday objects in your household

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.