शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! लहान मुलांसाठी व्हिटॅमीन डी उपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 23:39 IST

जन्मानंतर पहिल्या महिन्यात बाळाला तेलाने मसाज करून उघड्यावर सूर्यप्रकाशात अंघोळ घातली आणि १० मिनिटे सूर्यप्रकाश मिळू दिला,

डॉ. अमोल अन्नदातेमोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांना अगदी जन्मापासून व्हिटॅमीन डीची गरज असते. हाडांसोबतच प्रतिकारशक्ती व त्यातच श्वसनाच्या जंतू संसर्गाविरोधात व्हिटॅमीन डीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दमा असलेल्या मुलांमध्ये व्हिटॅमीन डीची पातळी नॉर्मल राहणे गरजेचे असते. आईच्या दुधात इतर सर्व घटक असतात; पण व्हिटॅमीन डीबाबत मात्र ते कमी पडते. तसेच याच्या पूर्ततेसाठी सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान अर्धा तास मुलांना उन्हात ठेवणे व्यावहारिक नाही. त्यामुळे सर्व वयोगटातील लहान मुलांना व्हिटॅमीन डीची गरज भासते. ज्यांना रोज उन्हात अंघोळ घातली जाते, असे बालक याला अपवाद असू शकतात.

जन्मानंतर पहिल्या महिन्यात बाळाला तेलाने मसाज करून उघड्यावर सूर्यप्रकाशात अंघोळ घातली आणि १० मिनिटे सूर्यप्रकाश मिळू दिला, तर मात्र त्यांना व्हिटॅमीन डीचे औषध देण्याची गरज पडणार नाही, असे लहान मुलांचे संप्रेरक तज्ज्ञ डॉ. तुषार गोडबोले सांगतात. पण, पहिल्या महिन्यात सूर्यप्रकाश मिळत नसल्यास मात्र जन्मापासूनच व्हिटॅमीन डीचे औषध ४०० कव रोज एक वेळ पहिले वर्ष द्यावे. यानंतर रोज ४०० ते ६०० कव प्रतिदिन देणे अपेक्षित आहे; पण रोज औषध देणे शक्य होत नाही. यासाठी एका वर्षानंतर ६०,००० कव आठवड्यातून एकदा ६ आठवडे व नंतर ऋतू बदलला म्हणजे प्रत्येक वेळी व्हिटॅमीन डी एकदा द्यायला हवे. ढोबळपणे दर ३ महिन्यांतून एकदा ६०,००० कव असा हा डोस येतो. याशिवाय मुलांच्या उन्हात खेळण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. शाळांमध्ये खेळण्याचे तास हे सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान ठेवण्यात यावेत. मुलांच्या शरीरातील व्हिटॅमीन डीचे प्रमाण ५० नॅनोग्रॅम प्रति मिलिलिटरपेक्षा जास्त असल्यास पुरेसे समजावे. त्यापेक्षा कमी असल्यास पूर्ण उपचारासाठी वयाप्रमाणे डोस द्यावा लागतो. त्यासाठी आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या