शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Coronavirus: 'ही' फॅन्सी उत्पादनं नका आणू घरात; कोरोनाचा वाढेल धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 1:06 AM

घरातील कोरोना विषाणू फिल्टरद्वारे बाहेर काढण्याचा दावा केला जातो. बरेच हेपा फिल्टर फक्त बॅक्टेरिया फिल्टर करतात, विषाणू नाही

अमोल अन्नदातेकोरोनाच्या साथीनंतर अनेक कोरोना उत्पादनांची साथही बाजारात आली आहे. यातली बरीचशी उत्पादने अनावश्यक आहेत, विज्ञानवादी नाहीत. अशा उत्पादनांपासून सावध राहावे. दारे उघडण्यासाठी प्लॅस्टिक व इतर साहित्याचे आकडे : असे भासवले जाते की, दार उघडणे बंद करण्यासाठी आपला हात लागणार नाही. पण आकडा आपण परत खिशात ठेवणार म्हणजे त्या जागेच्या संपर्कातून आकडा संसर्गित झाला तर तो परत आपल्याच खिशात येऊन आपल्याला संसर्गित करणार आहे. मग या आकड्याचा उपयोग काय?

  • हेपा फिल्टर्स : घरातील कोरोना विषाणू फिल्टरद्वारे बाहेर काढण्याचा दावा केला जातो. बरेच हेपा फिल्टर फक्त बॅक्टेरिया फिल्टर करतात, विषाणू नाही. जे काही प्रमाणात विषाणू फिल्टर करतात त्यांची गरज फक्त मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात अशा आॅपरेशन थिएटरमध्ये आहे.
  • वस्तू सॅनिटाइझ करण्यासाठी चेंबर्स : असे काही चेंबर्स निर्माण केले गेले आहेत, ज्यात अतिनील किरणे सोडली जातात व तुम्ही वस्तू आणली किंवा नोटा वापरण्याआधी यात काही वेळ ठेवायच्या व नंतर वापरायच्या, म्हणजे त्या निर्जंतुक होतील. हे निर्जंतुकीकरण अजून पूर्ण सिद्ध व्हायचे आहे. दुसरे असे की, अशा किती गोष्टी तुम्ही निर्जंतुक करणार आहात? त्या निर्जंतुककरण्याआधी कधी तरी, कुठे तरी तुमचा अशा वस्तूंशी संपर्क येणार आहे.
  • सॅनिटायझेशन चेंबर : कार्यालय, सोसायटी, घराबाहेर, बसच्या दारावर असे सॅनिटायझेशन चेंबर बसवले जात आहेत. पण अंगावर कुठल्याही सॅनिटायझेशनची फवारणी ही उपयोगाची तर नाहीच, शिवाय ती घातक ठरू शकते.
  • टेम्परेचर सेन्सर मॉनिटर : तापमान तपासणी ही स्क्रीनिंगची ढोबळ पद्धत आहे. महागडे तापमानाचे स्क्रीनिंग बसवून काही साध्य होणार नाही. संसर्ग झाल्यावर तीन-चार दिवसांनी लक्षणे सुरू होतात. त्यानंतरही ताप २४ तास असेलच असे नाही. म्हणून अशा मशीन बसवू नये.
  • कोरोना क्लिनिंग सर्व्हिस : खास कोरोनासाठी येऊन घर स्वच्छ केले जाण्याच्या जाहिरीतींना भुलू नका. पाण्यात सोडियम हायपोक्लोराइड टाकले व साधे ग्लोव्हज घातले तरी हे सहज करता येते.
  • एसी क्लिनिंग : हेही एसीची जाळी गरम पाण्यातून काढून एक दिवस उन्हात ठेवून सहज शक्य आहे. साबणाने हात धुणे, शारीरिक अंतर, सॅनिटायझर, मास्क, चष्मा किंवा जोखीम जास्त असलेले काम असल्यास फेस शिल्ड पुरेसे आहे.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स