दिलासादायक! भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे संभाव्य उपचार; उंदरांवरील चाचणी ठरली यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 04:05 PM2020-11-22T16:05:23+5:302020-11-22T16:23:43+5:30

CoronaVirus Nes & Latest Updates : मूळच्या भारतातील असलेल्या डॉ. तिरुमला देवी कन्नेगांती यांनी कोरोनाचे उपचार शोधल्याचा  दावा केला आहे.

Coronavirus treatment indo american doctor identifies potential treatment by research on mice | दिलासादायक! भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे संभाव्य उपचार; उंदरांवरील चाचणी ठरली यशस्वी

दिलासादायक! भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे संभाव्य उपचार; उंदरांवरील चाचणी ठरली यशस्वी

Next

कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर रुग्णाच्या फुफ्फुसांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी संभाव्य उपचारांचा शोध घेतला आहे. मूळच्या भारतातील असलेल्या डॉ. तिरुमला देवी कन्नेगांती यांनी कोरोनाचे उपचार शोधल्याचा  दावा केला आहे. तिरूमला देवी या टेनेसी येथिल सेंट ज्यूड चिल्ड्रेन रिसर्च हॉस्पिटलमधील तज्ज्ञ आहेत. याचे हे नवीन संशोधन सेल जर्नलच्या ऑनलाईन आवृत्तीत प्रकाशित झाले आहे. 
उंदरांवर करण्यात आलेल्या या अभ्यासात त्यांना दिसून आलं की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे पेशींमध्ये सूज आली होती.

याशिवाय संक्रमणामुळे इतर अवयवांचेही नुकसान झाले होते. डॉ. तिरुमला देवी कन्नेगांती यांनी या स्थितीपासून वाचवत असलेल्या संभाव्य औषधांची ओळख पटवली आहे.  यांनी या विषयावर सखोल अध्ययन केले होते. सेंट ज्यूड रुग्णालयातील विज्ञान विभागाच्या उपाध्यक्ष डॉ. कन्नेगांती यांनी सांगितले की, हे कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि सूज येण्यासाठी कारणीभूत ठरणारे घटक यांचा अभ्यास करण्यात आला होता.

बापरे! 'कोरोना पुन्हा होऊ शकतो हे नक्की, काळजी घेत राहा', डॉक्टरांच्या विधानाने वाढली चिंता

कन्नेगांती यांचा जन्म तेलंगणात झाला असून त्या तेलंगणातच लहानाच्या मोठ्या झाल्या.  वारंगलच्या काकतिय विद्यापिठातून त्यांनी रसायन शास्त्र, जंतू विज्ञान आणि वनस्पती विज्ञान याच्या पदव्या मिळवल्या. त्यानंतर त्यांनी पीएचडी भारतातील उस्मानिया विद्यापिठातून केली. सन २००७ मध्ये  डॉ. कन्नेगांती टेनेसीतील मेमफिलमधील सेंट ज्यूड रुग्णालयाशी जोडल्या गेल्या.

डॉ. कन्नेगांती यांनी सांगितले की, '' या अभ्यासातून खास सायटोकाईन्सची ओळख पटवली आहे. ज्यामुळे पेशींमध्ये सूज येऊन इतर समस्या   निर्माण होतात. या संशोधनाच्या आधारे कोरोना सह उच्च मृत्यूदर असलेल्या आजारांचे उपचार शोधता येऊ शकतात.'' या संशोधनात श्रद्धा तुलाधर, पिरामल समीर, मिन झेंगे, बालामुरुगन सुंदरम, बालाजी भनोठ, आरके सुब्बाराव मलिरेड्डी या तज्ज्ञांचाही सहभाग होता.

वाढत्या थंडीमुळे होणारी सर्दी, एलर्जी की कोरोनाचं इन्फेक्शन? जाणून घ्या लक्षणांमधील फरक

दरम्यान कोरोनाची लागण पुन्हा होऊ शकते हे नक्की आहे असं नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही. के. पॉल यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काळजी घेणं सुरूच ठेवलं पाहिजे असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. यामुळे लोकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या जवळपास 15 ते 20 जणांना आयसोलेशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण काळजी न घेतल्यास संसर्ग पसरू शकतो. 

ज्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, त्या व्यक्तीच्या दोन दिवस आधीपासून संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये ठेवणे आवश्यक आहे. असं डॉ. पॉल यांनी म्हटलं आहे.  देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 45 हजार 209 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 501 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: Coronavirus treatment indo american doctor identifies potential treatment by research on mice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.