Coronavirus symptoms: coronavirus these symptoms are early signs of covid-19 infection | Coronavirus symptoms: समोर आलं कोरोनाचं वेगळंच लक्षण; फक्त वास, चव जाणचं नाही तर 'असा' बदल दिसल्यास व्हा सावध

Coronavirus symptoms: समोर आलं कोरोनाचं वेगळंच लक्षण; फक्त वास, चव जाणचं नाही तर 'असा' बदल दिसल्यास व्हा सावध

कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात कहर केलेला पाहायला मिळत आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर वाढताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासात  १ लाख ६८ हजार कोरोना संक्रमित लोक समोर आले आहे. याशिवाय कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ झालेली पाहायला मिळत आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या महितीनुसार ताप, वास, चव न जाणवणं, थकवा, अंगदुखी याशिवाय अन्य काही लक्षणंही कोरोना संक्रमणानंतर जाणवू शकतात. 

किंग्ज कॉलेज लंडनचे प्राध्यापक टिम स्पेक्टर यांनी म्हटले आहे की, '' जर आपल्या जिभेचा रंग बदलत असेल तर ते कोरोनाचे लक्षण असू शकते. कोरोना इन्फेक्शन होत लोकांमध्ये ही समस्या गंभीर स्वरुपात रूप धारण करीत आहे, कारण जिभेच्या पुरळांमुळे, बर्‍याच वेळा तोंडात व्रणांसारखी परिस्थिती निर्माण होते. डॉक्टरांनी या लक्षणांना कोविड टंग (COVID Tonge)  म्हटले आहे.

कोरोनामध्ये ताप न येणे सामान्य आहे. परंतु कोरोनामधील यूके व्हेरियंटमध्ये रुग्णाला खूप ताप येतो. युके व्हेरियंटमध्ये आणखी बरीच वैशिष्ट्ये असल्याचेही अहवालात म्हटले आहे. उदाहरणार्थ, बहिरेपणा, स्नायू दुखणे, त्वचेचे संक्रमण, पोट खराब होणे आणि कंजक्टिवाइटिस.

जास्त घाम येणं ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण; जाणून घ्या लक्षणं अन् वेळीच व्हा सावध! 

कोविड टंगची समस्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. यामुळे लाळ न तयार होण्याचीही समस्या आहे. ज्यामुळे केवळ खाण्यामध्येच समस्या येत नाहीत तर पचनाशी संबंधित समस्या देखील आहेत. आणि खराब बॅक्टेरियाशी लढण्यासाठी शरीराच्या क्षमतेवर देखील परिणाम होत आहे.

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

प्राध्यापकांच्यामते आताही कोरोना संक्रमित ५ पैकी एक व्यक्तीमध्ये लक्षणे दिसत नाहीत. काही लोकांना त्वचेवर पुरळ येते. तर, कोविड टंगसह, तोंडात अल्सरची समस्या देखील उद्भवत आहे. तुम्हालाही अशीच लक्षणं जाणवत असतील वेळीच स्वतःला क्वारंटाईन करा. 

दरम्यान  गेल्या 24 तासांत देशात 1 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर विक्रमी 904 जणांचा मृत्यू झाला आहे. (Coronavirus situation is getting worse 117 new covid cases coming in india in every minute) या नव्या कोरोना रुग्णांची ही संख्या कुणाच्याही मनात धडकी भरवणारी आहे. सध्या देशात तासागणिक 7038 नवे कोरोना रुग्ण समोर येत आहेत. यात दर मिनिटाला 117 नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. तर सध्या, प्रत्येक मिनिटाला 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. यावरून देशातील कोरोना स्थितीचे गांभीर्य लक्षात येते.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus symptoms: coronavirus these symptoms are early signs of covid-19 infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.