'या' देशात लसीच्या मानवी चाचणीला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार; जाणून घ्या लस बाजारात कधी येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 10:03 AM2020-07-13T10:03:53+5:302020-07-13T10:20:02+5:30

CoronaVirus News : थायलँडमध्ये सप्टेंबर महिन्यात या लसीचे मानवी परिक्षण सुरू होणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांवरील चाचणीत या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

Coronavirus news today thailand to begin covid 19 vaccine human trials in september | 'या' देशात लसीच्या मानवी चाचणीला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार; जाणून घ्या लस बाजारात कधी येणार

'या' देशात लसीच्या मानवी चाचणीला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार; जाणून घ्या लस बाजारात कधी येणार

Next

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणात जगभरातील देश कोरोना व्हायरसवर लस आणि औषध शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगभरात जवळपास १६० लसींवर प्रयोग सुरू आहे. त्यातील २१ लसी क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. भारतात कोवाक्सिन १५ ऑगस्टला लॉन्च केली जाणार आहे तर चीनच्या कंपनीची लस सुद्धा अंतीम टप्प्यात आहे. रशियानेही लसीची सगळी परिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा केला आहे.  दरम्यान थायलँडच्या लसीबाबात सकारात्मक  माहिती समोर येत आहे. 

थायलँडने आपल्या लसीचे ट्रायल उंदरांवर आणि माकडांवर केले आहे. आता लवकरच मानवी चाचणीची सुरूवात होण्याची शक्यता आहे. द मिंट ने दिलेल्या माहितीनुसार थायलँडमध्ये सप्टेंबर महिन्यात या लसीचे मानवी परिक्षण सुरू होणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार प्राण्यांवरील चाचणीत या लसीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यानंतर ही लस लवकरच यशस्वी होईल. माकडांवर आणि उंदरावर केलेल्या परिक्षणात कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या एँटीबॉडी दिसून आल्या. संशोधकांनी दिलेल्या माहीतीनुसार  या लसीचा प्रयोग माणसांवर केल्यानंतरही एँटीबॉडी विकसित होण्याची शक्यता आहे. 

बँकॉकच्या चुललॉन्गकोर्न विद्याापीठातील लस विकास कार्यक्रमाचे प्रमुख रक्सरुन्गथम यांनी दिलेल्या माहितीनुसार तज्ज्ञ सध्या लसीचे डोस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातील सकारात्मक परिणांमानंतर शेवटचे मानवी परिक्षण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वॉलेंटीअर्सना दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागण्यात येईल. त्यानंतर ट्रायल केले जाणार आहे. पहिल्या गटात १८ ते ६० वर्ष आणि ६० ते ८० वर्ष मानवी चाचणीसाठी अशी विभागणी केली जाईल.

चाचणीसाठी स्वयंसेवकांना भरती केलं जाणार आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी चाचणीसाठी १० हजार डोस तयार केले जाणार आहे. लसीच्या चाचणीसाठी खाद्य आणि औषधी प्रशासनाकडून आपातकालीन स्थितीत संसाधनांची मागणी केली जाणार आहे. या लसीचे मानवी परिक्षण यशस्वी झाल्यास पुढच्यावर्षी जून महिन्यात ही लस तयार होऊ शकते. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. जगभरातील सगळ्या कोरोनाबाधित देशांत  ही लस पोहोचवण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.  

एसीमुळे पसरतंय कोरोनाचं संक्रमण; संसर्गापासून बचावासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 'या' टिप्स 

युद्ध जिंकणार! 'या' देशात कोरोनाची लस अंतिम टप्यात; २० कोटी लसींचे डोस तयार होणार

Web Title: Coronavirus news today thailand to begin covid 19 vaccine human trials in september

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.