धोका वाढला! कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका असलेल्यांसाठी; लस उपयोगी ठरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:15 AM2020-06-24T11:15:38+5:302020-06-24T11:25:36+5:30

CoronaVirus Latest News Update : लस देण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचा समावेश असायला हवा.

CoronaVirus News: Coronavirus vaccine older people risk | धोका वाढला! कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका असलेल्यांसाठी; लस उपयोगी ठरणार नाही

धोका वाढला! कोरोनाचा सगळ्यात जास्त धोका असलेल्यांसाठी; लस उपयोगी ठरणार नाही

googlenewsNext

कोरोना व्हारसचा प्रसार जगभरात झपाट्याने वाढत चालला आहे. तज्ज्ञांच्या संशोधनातून कोरोनाबाबतच्या नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सध्या  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना कोरोनाच्या संक्रमणाचा जास्त धोका आहे. त्याच्यासाठी लस परिणामकारक ठरू शकणार नाही. म्हणजेच वयस्कर लोक लसीच्या  सकारात्मक परिणामांपासून वंचित राहू शकतात.

वयस्कर लोकांच्या आसपास असेलेल्या व्यक्तींना लस दिल्यास रोगप्रतिकारकशक्ती बळकट बनवता येऊ शकते. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराचा धोका कमी होऊ शकतो. द गार्डीयनने दिलेल्या माहितीनुसार लंडन कॉलेजचे प्रोफेसर पीटर ओपेनशव यांनी ब्रिटिश संसदेतील सायंस एंड टेक्नोलॉजी कमिटीला सांगितले की, लस देण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील लोकांचा समावेश असायला हवा.

ज्या लोकांना कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका आहे. अशा लोकांचा बचाव करण्यासाठी त्यांच्या जवळपास राहत असलेल्या लोकांना लस द्यायला हवी. ब्रिटिश सोसाइटी ऑफ इम्युनोलॉजीचे प्रमुख अर्ने अकबर यांनी सांगितले की, जास्त वयाच्या लोकांच्या रोगप्रतिकारकशक्तीत कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवतात याची माहिती करून  घ्यायला हवी.

कोरोना से जिन्हें सबसे अधिक खतरा, उनके लिए काम नहीं करेगी वैक्सीन?

अधिक वयाच्या निरोगी लोकांच्या शरीरात इन्फ्लेमेशन जास्त प्रमाणात होते. वयस्कर लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासह  इतर गोष्टींबाबतही काळजी घ्यायला हवी. वयस्कर माणसांना लसीसोबतच एंटीइंफ्लेमेटरी औषध म्हणजेच Dexamethasone सारख्या औषधांनी फायदा मिळू शकतो. पण त्यासाठी तज्ज्ञांनी संशोधन सुरू ठेवायला हवे.

दरम्यान  जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 90 लाखांवर गेली आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत आता चौथ्या स्थानी आला आहे. तर देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. 

कोरोनाच्या उपचारांसाठी नवीन औषधाचा वापर; पण डॉक्टरांच्या मनात आहे 'ही' भीती

Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा!

Web Title: CoronaVirus News: Coronavirus vaccine older people risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.