शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

CoronaVirus News : संपता संपेना कोरोनाचा कहर! आता 'या' राज्यांवर कोरोनाच्याा नव्या 'डबल म्यूटेंट स्ट्रेन'चं संकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 12:01 IST

CoronaVirus News & Latest Updates : जवळपास पाच महिन्यांनंतर भारतात एका दिवसात  ५० हजारांपेक्षा जास्त केसेस  दिसून आल्या आहेत.  वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आता पुन्हा एकदा मागच्या वर्षीच्या  दिवसांची आठवण होत आहे.

सध्या  कोरोना लाटेसंबंधी रोजंच खळबळजनक माहिती समोर येत आहे.  त्यात सगळ्यात महत्वपूर्ण बाब अशी की भारतात कोरोनाचा डबल म्यूटेंट वेरिएंट दिसून आला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काही दिवसांपूर्वी सांगितले होते की,  भारतात कोरोनाचा नवीन वेरिएंट मिळाला आहे. काही राज्यात या प्रकारच्या कोरोना संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसचा धोका देशात पुन्हा एकदा वाढला आहे. जवळपास पाच महिन्यांनंतर भारतात एका दिवसात  ५० हजारांपेक्षा जास्त केसेस  दिसून आल्या आहेत.  वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे आता पुन्हा एकदा मागच्या वर्षीच्या  दिवसांची आठवण होत आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन कितपत जीवघेणा ठरतोय तसंच हा स्ट्रेन कोणकोणत्या राज्यात वाढतोय याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

देशात कोरोनाचे  कोण कोणते स्ट्रेन मिळाले आहेत

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बुधवारी एक प्रेस रिलिज  जारी केलं होतं. त्यानुसार जिनोम सिक्वेंसच्या आधारावर देशातील १० लॅबमधून जी माहिती समोर आली होती त्यात त्याबाबत खुलासा करण्यात आला होता. यानुसार भारतात कोरोना व्हायरसचे तीन नवीन वेरिएंट सापडले आहेत ते युके वेरिएंट आणि दक्षिण आफ्रेकितील तसंच ब्राजीलियन वेरिएंटशी संबंधीत आहे. देशात अचानक वाढत असलेल्या रुग्णसंख्येमागे  हेच मुख्य कारण असावं का? याबाबत अजूनही खुलासा करण्यात आलेला नाही. देशभरातील शास्त्रज्ञ या नवीन वेरिएंटवर परिक्षण करत आहेत.

सरकारने अशी माहिती दिली आहे की देशात कोरोनाची अशी 771 प्रकरणे आहेत, ती नवीन स्ट्रेनशी संबंधित आहेत. यामध्ये यूकेच्या कोरोना व्हेरिएंटची 736 प्रकरणे, दक्षिण आफ्रिकन प्रकारातील 34 प्रकरणे आणि ब्राझिलियन व्हेरियंटमधील एक प्रकरणांचा समावेश आहे. महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही कोरोनाचे नवीन स्ट्रेन सापडले आहेत.

खरं तर, आरोग्य मंत्रालयाने १० राष्ट्रीय प्रयोगशाळांचा एक गट तयार केला होता, जी कोरोनाच्या वेगवेगळ्या जिनोम-सीक्वेन्सिंगवर परिक्षण करीत आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमधील सर्व 14 जिल्ह्यांमधून 2032 नमुन्यांची जीनोम्सचे परिक्षण करण्यात आले असून यापैकी 11 जिल्ह्यांतील 123 नमुन्यांचा लोकांच्या प्रतिकारशक्तीवर कोणताही परिणाम झाला नाही. 

 कोणत्या राज्यांना जास्त धोका?

वास्तविक संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा प्रसार होत आहे. पण  काही राज्यात या स्ट्रेननं संक्रमित रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. पंजाबमध्ये युकेच्या कोरोनाच्या स्ट्रेनचे अधिक केसेस दिसून आल्या आहेत. याठिकाणी एकू 336 केसेस मिळाल्या असून तेलंगणा, दिल्ली, महाराष्ट्र,आंध्रप्रदेश,  गुजरातमध्येही युकेचा वेरिएंट मिळाला आहे. CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे अनेक केसेस समोर आल्या त्यात SARS-CoV-2  हा वेरिएंट दिसून आला. सध्या दोन नवीन म्यूटेंट वेरिएंट मिळाले आहेत.  त्यांचे नाव E484Q आणि L452R आहे.  हे स्ट्रेन युकेच्या स्ट्रेनशी संबंधीत आहेत. डिसेंबर २०२० पासून महाराष्ट्रात या संबंधित केसेस अधिकाधिक वाढत असून याबाबत या अभ्यासात उल्लेख करण्यात आला आहे. या स्ट्रेनमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होत आहे. २० टक्के प्रकरणांमध्ये व्हायरस म्यूटेंट झाला असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.  कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रPunjabपंजाबAndhra Pradeshआंध्र प्रदेशGujaratगुजरातdelhiदिल्ली