Hearing loss with covid-19 : कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 03:49 PM2021-03-24T15:49:02+5:302021-03-24T15:53:00+5:30

Hearing loss with covid-19 : इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडीओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे

Hearing loss problems associated with covid-19 study says | Hearing loss with covid-19 : कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा

Hearing loss with covid-19 : कोरोना संक्रमणामुळे येऊ शकतो बहिरेपणा; तुम्हालाही जाणवत असतील लक्षणं तर वेळीच सावध व्हा

googlenewsNext

कोरोना संक्रमणामुळे फक्त फुफ्फुसं आणि हृदयावरच नाही तर तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरसनं संक्रमित लोकांमध्ये कर्णबधिपणाची समस्या जाणवत आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडीओलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. या रिपोर्टमध्ये असं दिसून आलं की,  रुग्णालयातून उपचार घेऊन परत आलेल्या  १३ टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. 

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टर आणि एनआयएचआर मॅनचेस्टर बायोमेडिकल रिसर्च सेंटर (बीआरसी)च्या वैज्ञानिकांनी अध्ययनातून हा खुलासा केला आहे. प्राध्यापक केविन मुनरो यांनी या अभ्यासादरम्यान  अशा ५६ लोकांना निवडलं ज्यांना कोरोनाच्या संक्रमाणानंतर कमी ऐकायला येत होते. ऐकण्याची समस्या उद्भवत असलेल्या ७.६ टक्के  लोकांना ऐकून येत नव्हतं तर १४.८ टक्के लोकांना  अनावश्यक आवाज ऐकू येत होते. तर चक्कर येत असलेल्या लोकांची  संख्या ७.२ होती.

तज्ज्ञ काय सांगतात

युनिव्हर्सिटी ऑफ मॅनचेस्टरमधले प्राध्यापक आणि संशोधक केविन मुनरो यांनी रिपोर्टमध्ये सांगितले की, याबाबत तज्ज्ञांनी अधिक लक्ष द्यायला हवं. कोरोनाचा सामना करत असलेल्यांना कानांची दीर्घकालीन समस्या उद्भवू शकते. याआधीही मेनिन्जाइटिस आणि  गोवर या आजारांमुळे ऐकण्याची समस्या कमी झालेली पाहायला मिळाली. आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

यापूर्वी, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या 'जर्नल बीएमजे' मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात संशोधकांनी म्हटले होते आहे की 45 वर्षीय कोविड -१९ पेशंटला  योग्य प्रकारे ऐकू येत नसल्याची समस्या उद्भवली होती. या रुग्णाला कोरोनाच्या उपचारांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून गेल्यानंतर त्यांना कानात मुंग्या येणे आणि ऐकू न येण्याची समस्या जाणवली. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

४० ते ५० टक्के बहिरेपणा आल्यानंतर डॉक्टरांकडे येतात आणि किंचित कमी ऐकू येते, असे सांगतात. खरे तर उपचार जेवढा लवकर सुरू होईल, तेवढा तो जास्त परिणामकारक आणि फायदेशीर. कारण बहिरेपणा वाढत गेल्यास रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम होतोच, त्याशिवाय कौटुंबिक, सामाजिक जीवनात मर्यादा येतात. त्याशिवाय त्यांच्या व्यवसायावरही वाईट परिणाम होतो आणि नैराश्य येणे, चिडचिडेपणा वाढणे या गोष्टीही विशेषत: वयस्कर लोकांमध्ये आढळतात. त्यामुळे कमी ऐकू येत आहे असे लक्षात आले की, कोरोनाकाळाच त्वरित ईएनटी सर्जनचा सल्ला घेऊन लवकरात लवकर उपचार करणे हितकारक ठरते.

Web Title: Hearing loss problems associated with covid-19 study says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.