CoronaVirus News : पुढच्या 15-20 दिवसात देशात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 01:57 PM2021-04-02T13:57:23+5:302021-04-02T14:05:15+5:30

CoronaVirus News & Latest Updates : आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षणं नोंद केली आहेत. यामुळे पुन्हा चिंताजनक वातावरण तयार झालं आहे. 

CoronaVirus News : Corona updates corona second wave in india may peak in 15 to 20-days | CoronaVirus News : पुढच्या 15-20 दिवसात देशात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus News : पुढच्या 15-20 दिवसात देशात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

googlenewsNext

देशभरासह राज्यात कोरोना (CoronaVirus) संक्रमणाचा वेग वाढत आहे. गेल्या चोविस तासात  ८१, ४६६ नव्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी भीती अनेकांच्या मनात आहे. आता कोरोनाच्या प्रसाराबाबत आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे.  देशात येत्या १५ ते २०  दिवसात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारे काही निरीक्षणं नोंद केली आहेत. यामुळे पुन्हा चिंताजनक वातावरण तयार झालं आहे. 

मनिंद्र अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १५  ते २० दिवसात रोज ८० हजार ते ९० हजार कोरोना रुग्णांची भर पडणार आहे. ही आकडेवारी यापेक्षाही जास्त असू शकते. नंतर काही दिवसांनी यात घसरण होण्याची शक्यता आहे.  गेल्या सहा महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्येने नवा उच्चांक नोंदवला आहे. गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 

देशातील रुग्णसंख्येने गेल्या काही महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी (२ एप्रिल)केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत कोरोनाचे ८१,४६६ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,23,03,131 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,६३,३६९ वर पोहोचला आहे. रिपोर्टनुसार, देशातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही ६,१४,६९९ आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत दीड लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या संकटात दिलासादायक बाब म्हणजे १,१५,२५,०३९ लोकांनी कोरोनावर मात केली असून ही लढाई जिंकली आहे. 

मुंबईत दैनंदिन उच्चांक  

कोरोनाचा कहर सुरु असून दैनंदिन रुग्णांची संख्या नवा विक्रम रचत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसह सामान्य मुंबईकरांच्या चिंतेतही भर पडली असून संसर्ग नियंत्रणाचे आव्हान कठीण होत चालले आहे. शहर उपनगरात गुरुवारी ८,६४६ रुग्णांची नोंद झाली असून १८ बळी गेले आहेत. बाधितांची संख्या ४ लाख २३ हजार ३६० झाली असून मृतांचा आकडा ११,७०४ झाला आहे. वाढत्या गरमीच्या वातावरणात खोकला अन् तापापासून बचाव करतील हे ३ पदार्थ; वाचा एक्सपर्ट्सचा सल्ला

२५ ते ३१ मार्चपर्यंत कोविड वाढीचा दर १.३८%

झोपडपट्ट्या व चाळींच्या वस्तीत सक्रिय कंटेनमेंट झोन्स ८० असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ६५० आहे. २४ तासांत रुग्णांच्या सहवासातील २७,०११ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

Web Title: CoronaVirus News : Corona updates corona second wave in india may peak in 15 to 20-days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.