दिलासादायक! तरूणांसह वृद्धांमध्येही चीनी कंपनीच्या लसीचे सकारात्मक परिणाम; लवकरच लस येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 11:44 AM2020-10-19T11:44:02+5:302020-10-19T12:02:20+5:30

CoronaVirus News & Latest Updates : या अभ्यासात 'बीजिंग इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स' च्या संशोधकांनी सहभाग घेतला होता.

CoronaVirus News : China new corona virus vaccine given promising result in clinical trial | दिलासादायक! तरूणांसह वृद्धांमध्येही चीनी कंपनीच्या लसीचे सकारात्मक परिणाम; लवकरच लस येणार

दिलासादायक! तरूणांसह वृद्धांमध्येही चीनी कंपनीच्या लसीचे सकारात्मक परिणाम; लवकरच लस येणार

googlenewsNext

कोरोना व्हायरसने गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाची लस कधी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यांनाच आहे. गुरूवारी द लॅसेंट इंफेफ्शियस डिसीज या वैद्यकिय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या माहितीनुसार चीनी कंपनीच्या या लसीचे स्वयंसेवकांवर सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या लसीमुळे कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडीजचा विकास झाला आहे. या चाचणीसाठी स्वयंसेवकांवर २९ एप्रिल ते  ३० जुलैदरम्यान  चाचणी करण्यात आली होती. या अभ्यासात 'बीजिंग इंस्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रोडक्ट्स' च्या संशोधकांनी सहभाग घेतला होता.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार सुरूवातीच्या टप्प्यात जवळपास  ४२ स्वयंसेवकांवर  एंटीबॉडीचे  चांगले परिणाम दिसून आले होते. द लॅसेंट इंफेक्शियस डिसीजमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये संशोधकांनी दावा केला आहे की, ही लस  प्रभावशाली असून संपूर्ण चाचणी प्रक्रियेदरम्यान स्वयंसेवकांवर साईड इफेक्ट्स दिसून आलेले नाहीत. या लसीची चाचणी १८ ते  ८० वयोगटातील ६०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांवर करण्यात आली होती. 

तीसरे चरण में पहले से 4 वैक्सीन

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरूवातीच्या टप्प्यात लसीची सुरक्षा आणि इम्यून रिस्पॉन्सची तपासणी केली जाणार आहे. ही लस कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी फायदेशीर ठरेल की नाही याबबत अजूनही काही स्पष्ट झालेलं नाही. संशोधकाच्यामते वैद्यकिय चाचणीच्या सुरूवातीच्या टप्प्यात समोर आलेले आकडे शेवटच्या टप्प्यातील चाचणीसाठी महत्वपूर्ण ठरतील. पॉझिटिव्ह बातमी! शास्त्रज्ञांनी शोधलं कोरोनाला नष्ट करण्याचं नवं तंत्र, आता विषाणूंची वाढ रोखता येणार

चीनच्या चार लसी या वैद्यकिय चाचणीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहे यातील एक लस जुलैमध्ये सुरू झालेल्या आपातकालीन कार्यक्रमाअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कामगारांना उपलब्ध करून दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील अनेक देशातील ४० पेक्षा जास्त लसी या वैद्यकिय चाचणीमध्ये आहेत. कोरोना संसर्गामुळे शरीरावर होत आहेत 'असे' परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा, जाणून घ्या उपाय

देशात कोरोनाची दुसरी लाट येणार का?

कोरोना व्हायरसने भारतातील अनेक राज्यांमध्ये कहर केला आहे. सात ते आठ महिन्यांनंतरही कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत नाहीये. सध्याच्या घडीला उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या ८ लाखांपेक्षा कमी आहे. कोरोना रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण सध्या कमी झालं असलं तरी धोका कायम आहे. लवकरच देशात कोरोनाची दुसरी लाट येईल, असा धोक्याचा इशारा नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिला आहे. हिवाळ्यात कोरोनाची लाट येऊ शकते, अशी भीती पॉल यांनी व्यक्त केली आहे.

देशातल्या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या टीमचं नेतृत्त्व व्ही. के. पॉल यांच्याकडे आहे. 'गेल्या तीन आठवड्यांपासून देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाणदेखील कमी झालं आहे. अनेक राज्यांमधील स्थिती नियंत्रणात आली आहे,' अशी माहिती पॉल यांनी दिली.

Web Title: CoronaVirus News : China new corona virus vaccine given promising result in clinical trial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.