Coronavirus information covid-19 infection question answer on coronavirus | कोरोना संसर्गामुळे शरीरावर होत आहेत 'असे' परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा, जाणून घ्या उपाय

कोरोना संसर्गामुळे शरीरावर होत आहेत 'असे' परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा, जाणून घ्या उपाय

जगभरात कोरोबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत चार कोटींपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा ११ लाख १५ हजारांवर पोहोचला आहे. आतपर्यंत ९९ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमणातून बाहेर आले आहे. जगभरातील सक्रिय संक्रमित रुग्णांची संख्या एक कोटींच्या आसपास आहे. भारतातही कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. वेगवेगळ्या माध्यमातून कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागत आहे. 

दिल्लीतील लेडी हार्डींग मेडिकल कॉलेजचे डॉ. राजेंद्र कुमार धमीजा यांनी सांगितले की,''सुरूवातीला हा आजार फक्त श्वसनासंबंधी आजार असल्याचे दिसून आलं होतं. कालांतराने मल्टीऑगर्न डिसीज असल्याचे निष्पन्न झाले. कारण कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा परिणाम फुफ्फुसं, मेंदू, हृदय, लिव्हर, किडनी यांवर होत होता. ''

डॉ. राजेंद्र कुमार धमीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसपासून बचावसाठी सण उत्सावानिमित्त कोणाच्याही घरी जाऊ नका. तसंच कोणलाही  स्वतःच्या घरी बोलवू नका.  कोणीही नातेवाईक घरी आल्यास त्याच्यात कोरोना किंवा इतर आजाराची लक्षणं दिसत आहेत की नाही, याची काळजी घ्या. सगळ्यात महत्वाचं सणांच्यावेळी खरेदी करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. 

धोका अजूनही टळलेला नाही

कोरोनाच्या माहामारीचा ग्राफ खाली जाणं म्हणजेच देशात सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे, असं अजिबात नाही. लोकांच्या लहानात लहान चुकांमुळे पुन्हा हा ग्राफ वर जाऊ शकतो. युरोपमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. फ्रांसमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या स्थितीपासून बचावासाठी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. 

पुढे त्यांनी सांगितले की, ''पॉझिटिव्हिटी रेट केरळमध्ये मागच्या सात दिवसांमध्ये १६ टक्के आणि महाराष्ट्रात १३. ८ टक्के आहे. राजस्थानमध्ये ११.३ टक्के तर पश्चिम बंगालमध्ये ८.६ टक्के आहे. आतापर्यंत ही स्थिती गंभीर असल्याचे मानलं जात आहे. केरळमध्ये प्रति मिलियन एक लाखांपेक्षा जास्त कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पॉझिटीव्हिटी रेट वाढलेला दिसून आला, हे फारचं चिंताजनक आहे. इतर राज्यांमध्येही लोक सावधगिरी बाळगतील तेव्हा पॉझिटिव्हिटी रेट कमी होईल.'' उपवास करूनही वाढवू शकता रोगप्रतिकारकशक्ती; फक्त 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

मागच्या ४५ दिवसात देशात आठ लाख नवीन कोरोना रुग्ण सापडले असून एक चांगला संकेत मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावर पाहिल्यास सुधारणा झालेली दिसून येत आहे. पण केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अजूनही धोका कमी झालेला नाही. या राज्यातून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. म्हणून लोकांनी सावध राहायला हवं.  पॉझिटिव्ह बातमी! शास्त्रज्ञांनी शोधलं कोरोनाला नष्ट करण्याचं नवं तंत्र, आता विषाणूंची वाढ रोखता येणार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus information covid-19 infection question answer on coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.