Covid-19 scientists developed new way to stop corona virus from replicating itself | पॉझिटिव्ह बातमी! शास्त्रज्ञांनी शोधलं कोरोनाला नष्ट करण्याचं नवं तंत्र, आता विषाणूंची वाढ रोखता येणार

पॉझिटिव्ह बातमी! शास्त्रज्ञांनी शोधलं कोरोनाला नष्ट करण्याचं नवं तंत्र, आता विषाणूंची वाढ रोखता येणार

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी एक नवीन तंत्र विकसित केली आहे. याचा वापर करून कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतं. या नवीन तंत्रामुळे कोरोनाचा प्रसार करणारं खास प्रोटीन ब्लॉक होतं. कोरोनाने शरीरात प्रवेश केल्यानंतर प्रोटीन इम्यून सिस्टीमचे महत्वपूर्ण भाग खराब होतात. या नवीन  तंत्राने  कोरोनाच्या  पेशींना वाढण्यापासून रोखता येऊ शकतं. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी औषध तयार करण्यासाठी हे संशोधन परिणामकारक ठरेल. हे संशोधन जर्नल साइंसमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. 

वैज्ञानिकांनी या प्रक्रियेसाठी दोन अणूंचा विकास केला होता. जे कोरोना व्हायरसद्वारे वापरल्या जात असलेल्या सीजर एंजाइम्सना रोखतात. याला SARS-CoV-2-PLpro म्हणतात.  SARS-CoV-2-PLpro व्हायरल आणि ह्यूमन प्रोटीन्स दोन्हींना वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. हेल्थ सायंस सेंटरमध्ये बायोकेमेस्ट्री आणि स्ट्रक्चरल बायोलॉजीचे साहाय्यक प्राध्यापक ऑल्सन यांनी सांगितले की,  हे एंजाइम्स  प्रोटीन्स रिलिजना प्रोत्साहीत करतात. त्यामुळे व्हायरस रेप्लिकेट करण्याास मदत मिळते. 

ह्यूमन एंजाइम पर कोई असर नहीं

प्रोफेसर ऑल्सन यांनी सांगितले की, हा एंजाइम सायटोकाइंस आणि किमोकाइंससारख्या अणूंना बाधित  करतो. जे इम्यून सिस्टीमला इंफेक्शन करण्याचे संकेत देतात. 'SARS-CoV-2-PLpro  साधारणपणे यूबिक्टिन आणि ISG15 ह्यूमन प्रोटीन्सची चेन कापून टाकतात. संशोधकांनी असे तंत्र विकसित केले आहे. ज्याद्वारे SARS-CoV-2-PLpro  ला वाढण्यापासून रोखता येऊ शकतो. coronavirus: पहिल्या टप्प्यात देशातील ३० कोटी नागरिकांचे होणार लसीकरण, या व्यक्तींना असेल प्राधान्य

यामुळे मानवी प्रोटीन्सशी मिळत्या जुळत्या असलेल्या प्रोटीन्सची ओळख होते. फक्त  व्हायरल एंजाईम्स नाही तर समान कार्य असलेल्या ह्यूमन एंजाईमला रोकता येऊ शकतं. दरम्यान  कोरोनामुळे आतापर्यंत  ४ कोटींपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले असून  या जीवघेण्या व्हायरसच्या संपर्कात आल्यामुळे आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सगळ्यात जास्त प्रभाव भारत, अमेरिकेवर पाहायला मिळाला आहे. पॉझिटिव्ह बातमी! देशाच्या कानाकोपऱ्यात 'अशी' पोहोचणार कोरोनाची लस; PM मोदींनी सांगितला प्लॅन

हर्ड इम्यूनिटीपेक्षा लसीकरण सुरक्षित

आरोग्य संशोधन नियतकालिक लॅसेंटमध्ये प्रकाशित झालेल्या एका माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर ८० वैज्ञानिक आणि संशोधकांनी हर्ड इम्यूनिटीबाबत एक जाहीर पत्र लिहिले होते.  या पत्रात नमुद केलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी हर्ड इम्युनिटीचा अवलंब करणं कितपत सुरक्षित आहे याबाबत  पुरावे नाहीत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाला रोखण्यासाठी निर्णायक  आणि तात्काळ उपायांचा अवलंब करायला हवा. 

लॅसेंटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन केल्यामुळे आणि इतर समारंभ रोखल्यामुळे संक्रमणाचा वेग अनेक ठिकाणी कमी झाला आहे. तर काही देशात  कोरोनाची संक्रमणाची दुसरी लाट आलेली दिसून येते. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हर्ड इम्यूनिटीच्या उपायाचा अवलंब करणं फायद्याचे ठरणार नाही.  हर्ड इम्यूनिटी अशी प्रक्रिया आहे. ज्यामध्ये  मोठ्या समुहाला आजाराचं संक्रमण झाल्यामुळे आजाराशी लढत असलेल्या एंटीबॉडीज तयार होतात. एंटीबॉडी तयार करण्याची  हीच क्रिया लसीकरणाच्या माध्यमातूनही होऊ शकते. तज्ज्ञांनी  सांगितले की, हर्ड इम्यूनिटीचा धोका पत्करण्यापेक्षा लसीची वाट पाहणं योग्य ठरेल. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Covid-19 scientists developed new way to stop corona virus from replicating itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.