शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

CoronaVirus News : बापरे! कोरोनावर मात केलेल्या 80% रुग्णांना होतोय 'हा' आजार; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 11:58 AM

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन करण्यात येत आहे. नव्या रिसर्चमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून चिंता वाढवली आहे.

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 15,83,792 वर गेला आहे. तर गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 52,123 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 34,968 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे जगभरात देखील कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. 

जगभरात कोरोनावर संशोधन करण्यात येत आहे. नव्या रिसर्चमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून चिंता वाढवली आहे. देशात तब्बल दहा लाख तर जगात एक कोटी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लढाई जिंकली आहे. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आता कोरोनावर मात केलेल्या जवळपास 80% रुग्णांना हृदयाचा आजार होत असल्याची चिंताजनक माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे.

जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशनने याबाबतचा रिसर्च केला आहे. यामध्ये यावर्षी एप्रिल ते जून 2020 दरम्यान कोरोनातून बरे झालेल्या, मात केलेल्या 100 लोकांचा अभ्यास करण्यात आला. रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की 100 पैकी 78 रुग्णांना हृदयाच्या अनेक समस्या होत्या. 60 लोकांच्या हृदयाला सूज दिसून आली आहे. संशोधकांच्या मते सुरुवातीला अशा गंभीर समस्या रुग्णांना नव्हत्या, त्यांच्या अशी कोणतीही लक्षणं आधी आढळली नव्हती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही व्यक्तींसाठी कोरोना जीवघेणा ठरत आहेत. त्यांना मृत्यूचा धोका अधिक असल्याची माहिती मिळत आहे. उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती रिसर्चमधून समोर आली आहे. 6 फूट आणि त्यापेक्षा जास्त उंच असलेल्या लोकांचा कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा धोका हा इतर व्यक्तींच्या तुलनेत दुप्पट आहे असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ब्रिटनच्या मॅनचेस्टर युनिव्हर्सिटी आणि ओपन युनिव्हर्सिटीसह आंतरराष्ट्रीय रिसर्चर्सच्या एका टीमने याबाबत संशोधन केलं आहे. जवळपास दोन हजार लोकांचा यासाठी अभ्यास करण्यात आला होता. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकांचं पर्सनल प्रोफाईल, काम आणि घर या गोष्टींचा कोरोनाशी कसा संबंध आहे. याचा अभ्यास देखील या रिसर्चमध्ये प्रामुख्याने करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईचा वाघ! राणीच्या बागेतून थेट 'शक्ती' प्रदर्शन

WhatsApp ग्रुपच्या नोटिफिकेशन्सना कंटाळलात?; आता कायमस्वरूपी Mute करून टाका!

CoronaVirus News : बाबो! क्वारंटाईन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं तब्बल 50 लाख

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई

CoronaVirus News : फक्त 12 दिवसांत 5 लाख नवे रुग्ण; देशात कोरोनाचा वेग वाढला, चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला

CoronaVirus News : बापरे! उंच लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा

दिलदार सुपरहिरो! नोकरी गेली, इंजिनिअरवर भाजी विकण्याची वेळ आली; सोनू सूदने दिला मदतीचा हात

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्यDeathमृत्यू