CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशात तब्बल 10 लाख लोकांनी जिंकली कोरोनाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 08:34 AM2020-07-30T08:34:48+5:302020-07-30T08:47:00+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. देशात तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.

जगभरातील सर्व देश हे कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून मृतांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीदेखील सातत्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. जगभरात तब्बल एक कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत सहा लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 15 लाखांहून अधिक झाली आहे. मात्र याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. देशात तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

भारतात आतापर्यंत 10,21,611 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काही रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 64.23% टक्के झाले आहे. तसेच बरं होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे.

देशामध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 15,84,384 वर गेला आहे. तर आतापर्यंत देशभरात 35,003 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे.

देशात कोरोनाचा वेग वाढला असून चिंताजनक आकडेवारीने उच्चांक गाठला आहे. फक्त 12 दिवसांत कोरोनाचे तब्बल 5 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ब्लूमबर्ग कोरोना व्हायरस ट्रॅकरने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याच्या तुलनेत यावेळी 20 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने 15 लाखांचा टप्पा पार केला असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

भारतात जानेवारीमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा रुग्ण आढळून आला. त्यानंतर रुग्णांची संख्या पाच लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 148 दिवस लागले. मात्र त्यानंतर कमी दिवसांत कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात तब्बल एक कोटी लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

10,231,837 जणांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. जगभरातील एकूण रुग्णांची संख्या 16,917,714 आहे. तर 663,942 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.