CoronaVirus :डास चावल्यानं सुद्धा पसरतो कोरोना, किती तथ्य आहे यात ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 10:42 AM2020-03-30T10:42:53+5:302020-03-30T10:46:06+5:30

एखादा डास कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला चावल्यानंतर  इतर व्यक्तींना चावला तर इन्फेक्शन होतं का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

CoronaVirus : know facts The mosquito bite also spreads Corona | CoronaVirus :डास चावल्यानं सुद्धा पसरतो कोरोना, किती तथ्य आहे यात ?

CoronaVirus :डास चावल्यानं सुद्धा पसरतो कोरोना, किती तथ्य आहे यात ?

Next

कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे.  दिवसेंदिवस कोरोनाने संक्रमित झालेल्या  रुग्णांची  संख्या जगभरासह भारतात सुद्धा वाढत आहे. या  आजारापासून वाचण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे.  लोकांच्या मनात कोरोना व्हायरसशी निगडीत अनेक प्रश्न आहेत.  जसं की एखादा डास कोरोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीला चावल्यानंतर  इतर व्यक्तींना चावला तर इन्फेक्शन होतं का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.


डास चावल्याने कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं का?

आपल्या देशात हवामानात अनेक बदल  झपाट्याने होत असतात. डासांची संख्या सुद्धा वाढते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया असे जीवघेणे आजार पसरतात. त्यामुळे लोकांच्या मनात भीती आहे की डासांमुळे सुद्धा कोरोना व्हायरस पसरू  शकतो. पण केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की डासांमुळे कोरोना होत नाही तर हा आजार पसरण्यामागे अनेक वेगळी कारणं आहेत. WHO च्यामते  हा आजार एका व्यक्तीकडून इतर व्यक्तींकडे संक्रमित होत असतो. 

सध्या डासांमुळे कोरोना व्हायरस पसरतो अशाी कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही.  असं मत WHO ने स्पष्ट केलं आहे.  कोरोना व्हायरस हा श्वसनप्रणालीवर परिणाम करतो.  त्यामुळे व्यक्तीला शिंका येणं, खोकला, श्वास घेण्यासाठी त्रास होणं. असा त्रास जाणवतो. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग ठेवणं गरजेचं आहे. तसंच सद्यस्थितीत सरकारच्या सुचनांंचे पालन करणं गरजेचं आहे.  ( हे पण वाचा- CoronaVirus : डोळ्यांनीसुद्धा पसरू शकतो कोरोना? जाणून घ्या एक्सपर्ट्स मत...)

Web Title: CoronaVirus : know facts The mosquito bite also spreads Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.