वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

By manali.bagul | Published: September 23, 2020 05:56 PM2020-09-23T17:56:30+5:302020-09-23T18:06:07+5:30

CoronaVirus News & latest Updates : सतत दम लागत असेल आणि तीव्रतेने खोकला येत असेल तर कोरोनाचं लक्षणं असू शकतं. साधारणपणे ऑक्सिजनची कमतरता भासल्यास असा त्रास होतो. 

Coronavirus information coronavirus symptoms answer on covid 19 by experts | वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Next

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५६ लाखांच्या पुढे गेली आहे.  दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रसारात कोणत्या लक्षणांकडे गांभीर्यानं पाहायला हवं याबाबत कार्डिओलॉजिस्ट डॉ. बलबीर सिंह यांनी अमर उजालाशी बोलताना सांगितले की, तुम्हाला सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास सामान्य फ्लू असू शकतो. पण सतत दम लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि तीव्रतेने खोकला येत असेल तर कोरोनाचं लक्षणं असू शकतं. साधारणपणे ऑक्सिजनची कमतरता भासल्यास असा त्रास होतो. 

डॉ. बलबीर सिंह यांनी सांगितले की, ''अजूनही या व्हायरसला समजून घेणं कठीण आहे. अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की,  एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असेल आणि लक्षणं दिसत नसतील तर तो व्यक्ती बरा होऊ शकतो. तर अनेकदा पॉजिटिव्ह असलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते.  घरी आयसोलेशनवर असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास कधीही मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. म्हणून रुग्णालयात लगेचच भरती केलं जातं. 

जेव्हा कोरोनाची लक्षणं असून चाचणी पॉझिटिव्ह आलेली असते.  ज्यांना श्वासासंबंधी आजार असतो त्यांनी ऑक्सीमीटरचा वापर करायला हरकत नाही. भारतात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर  तुलनेनं चांगला आहे. यामागेही एक कारण आहे. भारतातील लोकसंख्येत तरूणांचे जास्त आहे. ''

पुढे त्यांनी सांगितले की, ''आपल्या देशात सुशिक्षित लोकही टेस्ट करून घेण्यासाठी अनेकदा विचार करत आहेत. पॉझिटिव्ह आल्यास घराला होम आयसोलेशनचा स्टिकर लावला जाईल अशी भीती त्यांना वाटते. पण वेळेवर चाचणी न केल्यास कोरोना संक्रमण महागात पडू शकतं हे समजून घ्यायला हवं. वेळेवर उपचार घेतल्यास या आजारापासून स्वतःला वाचवता येऊ शकतं. 

कोरोना विषाणू नेहमी नाक, डोळे, घसा या माध्यमातून शरीरात प्रवेश करतो. जे लोक मास्क वापरतात त्यांनीही अधिक काळजी घ्यायला हवी. मास्क वापरत असताना नेहमी नाकाच्या खाली  किंवा अनेकदा गळ्याजवळ असतो. संसर्गापासून बचाव करण्यासाठी या गोष्टी टाळायला हव्यात. ''

कोरोनातून बरं व्हायला किती वेळ लागतो

डॉ. बलबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्ण दोन प्रकारचे असतात. काही रुग्णांना लक्षणं दिसत असतील किंवा नसतील दिसत तरीही १०-२० दिवसात पूर्णपणे बरे होतात. दुसऱ्या प्रकारात ज्या रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो. व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे.  त्या रुग्णांचा समावेश असतो. एकदा रुग्ण व्हेंटिलेटरवर गेल्यास बरं होण्यासाठी महिन्याभराचा कालावधी लागू शकतो. अनेकदा रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात. गंभीर आजारांनी पिडीत असलेल्या लोकांना कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो. म्हणून वैयक्तिक स्वच्छता, मास्कचा वापर सतत करायला हवा. सावधगिरी न बाळगल्यास कोरोनाचं संक्रमण कधीही होऊ शकतं. 

फेस शिल्डमुळे कोरोना संसर्गापासून बचाव होत नाही

जपानी सुपर कंम्पुटरनुसार, (Japanese Supercomputer Fugaku) कोरोनापासून वाचण्यासाठी लोक प्लास्टिक शिल्डचा चेहऱ्यावर वापर करत आहेत. पण हे फेस शिल्ड्स ऐरोसोल्साला पकडण्यासाठी प्रभावी ठरत नसल्याचं दिसून आलं आहे. तसंच हे प्लास्टिक फेस शिल्ड कोरोनापासून पूर्णपणे सुरक्षित ठेऊ शकत नसल्याचा, दावा सुपर कंम्पूटरकडून करण्यात आला आहे.

जगातील सर्वात फास्ट कंम्पुटर फुगाकूने कोरोनापासून बचावसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक फेस शिल्डचं सिमुलेशन केलं आहे. ज्यात   १०० टक्के एयरबॉर्न ड्रॉपलेट्स ५ मायक्रोमीटरहून लहान आढळले. परिणामी पारदर्शी फेस शिल्डच्या वापरानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकत नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सेंटर फॉर कंम्पुटर सायन्स रिकेनचे प्रमुख  मोटो त्सुबोकोरा  यांनी सांगितलं की, फेस शिल्डला मास्कला पर्याय म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. मास्कच्या तुलनेत फेस शिल्ड कमी प्रभावी आहे.


हे पण वाचा-

'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान

दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...

पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय

भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग

Web Title: Coronavirus information coronavirus symptoms answer on covid 19 by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.