Coronavirus : How to sanitize vegetables and fruits with homemade sanitizer to prevent coronavirus | Coronavirus : भाज्यांवरील कोरोना दूर करण्यासाठी वापरा 'हे' होममेड सॅनिटायजर, वाचा कसं कराल तयार?

Coronavirus : भाज्यांवरील कोरोना दूर करण्यासाठी वापरा 'हे' होममेड सॅनिटायजर, वाचा कसं कराल तयार?

कोरोना व्हायरसच्या महामारीपासून बचाव करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अशात अनेकजण बाहेरून आणलेल्या वस्तू किंवा भाज्या-फळं हॅंड सॅनिटायजरने किंवा साबणाने धुतात. याने भाज्यांची गुणवत्ता तर खराब होतेच, सोबतच तुमच्या आरोग्यासाठीही हे नुकसानकारक ठरू शकतं.

अनेक ठिकाणी असं पाहिलं गेलं आहे की, भाज्या साबण किंवा डिटर्जंटने धुवून खाल्ल्यावर लोकांना पोटदुखी आणि इतरही काही समस्यांचा सामना करावा लागला. अशात चला जाणून घेऊन भाज्या-फळं धुण्यासाठी सॅनिटायजर बनवण्याची पद्धत..

काय सांगतात एक्सपर्ट

जर्मन फेडरल इन्स्टिट्यूट फॉर रिस्क अ‍ॅसेसमेंटच्या एका रिसर्चनुसार, फळं आणि भाज्यांमधून तुमच्यापर्यंत व्हायरस पोहोचू शकतो. कॅनडातील रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ फूड सेफ्टीचे डायरेक्टर जेफ फॉर्बर यांच्यानुसार, खाण्याआधी फळं आणि भाज्यांना साबणाने धुनं घातक ठरू शकतं. त्यामुळे गरजेच आहे की, तुम्ही फळं आणि भाज्या एका अशा सॅनिटायजरचा वापर करा ज्याने ना तुमचं आरोग्य बिघडेल ना भाज्या खराब होतील.

साहित्य

एक कप कडूलिंबाची पाने

1 कप पाणी

1 बॉटल स्प्रे करण्यासाठी

1 चमचा बेकिंग सोडा

कसं कराल तयार?

- सर्वातआधी कडूलिंबाची पाने धुवावी.

- आता एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात पाने टाका.

- हे कमी आसेवर गॅसवर ठेवा.

- पाणी 15 ते 20 मिनिटे उकडू द्या.

- पाण्याचा रंग हिरवा होईपर्यंत उकडायचं आहे.

- पाणी हिरवं झाल्यावर थंड होऊ द्या.

- नंतर त्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाका आणि चांगल्याप्रकारे मिश्रित करा.

- आता हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाका.

- जेव्हाही तुम्ही बाहेरून भाज्या आणि फळं आणाल तेव्हा आधी साध्या पाण्याने धुवा.

- त्यानंतर होममेड सॅनिटायजरने त्यावर स्प्रे करा आणि काही वेळ तसंच राहू द्या.

- जेव्हाही भाजी करायची असेल तेव्हा पुन्हा साध्या पाण्याने भाजी धुवा.

कसा होतो याचा फायदा?

आयुर्वेदात कडूलिंबाच्या पानाचं सेवन करण्याबाबत सांगण्यात आलं आहे. याने अनेक आजार दूर होत असल्याचं सांगितलं जातं. वैज्ञानिक आधारावर कडूलिंबाच्या पानांबाबत सांगायचं तर कडूलिंबाची पाने आणि बेकिंग सोड्यात अ‍ॅंटी बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी फंगल, अ‍ॅंटी व्हायरल आणि अ‍ॅंटी पॅरासाइड गुण असतात. याच प्रभावामुळे सॅनिटायजरच्या रूपात याचा वापर केला गेला तर हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसचा प्रभाव अनेक पटीने कमी करण्यासाठी हे प्रभावी ठरू शकतं.

तुम्हालाही सतत मास्क लावल्यानंतर गुदमरतं का?; प्रवासात मास्क वापराचा की नाही, जाणून घ्या

CoronaVirus News: आता Deodorant कोरोनाला रोखणार; भारतीय विद्यार्थ्यांनी मिळवलं पेटंट

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus : How to sanitize vegetables and fruits with homemade sanitizer to prevent coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.