Corona virus new strain found in mumbai : धोका वाढला! मुंबईत सापडला कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन; अधिक काळजी घ्यावी लागणार
By Manali.bagul | Updated: March 4, 2021 16:25 IST2021-03-04T16:16:02+5:302021-03-04T16:25:23+5:30
CoronaVirus News & Latest Updates : आता मुंबईत हा नवीन स्ट्रेन दाखल झाल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

Corona virus new strain found in mumbai : धोका वाढला! मुंबईत सापडला कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन; अधिक काळजी घ्यावी लागणार
संपूर्ण जगभरासह महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. पुणे,नागपूर अमरावती, वर्धा, हिंगोली परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. आतापर्यंत ब्रिटनसह इतर देशांमध्ये हा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती समोर येत होती. पण आता मुंबईत हा नवीन स्ट्रेन दाखल झाल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबईमध्ये ब्रिटनचा नवा कोरोना स्ट्रेन सापडला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या ४ वर पोहोचली आहे. ९० नमुन्यांपैकी एका व्यक्तीच्या अहवालात हा स्ट्रेन सापडला आहे. जिनोम सिक्वेन्सिंगनंतर एका रुग्णामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला. मुंबईत आतापर्यंत यूके स्ट्रेनच्या 4 केसेस झाल्या आहेत. दिल्लीच्या प्रयोग शाळेत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आलेल्या 90 पैकी एका सँपलमध्ये ब्रिटनमधील कोरोनाचा नवास्ट्रेन आढळून आला आहे. आतापर्यंत संपूर्ण अहवाल आलेले नाहीत.
याआधीच आढळून आलेल्या कोरोना रुग्णांवर मुंबईत अंधेरीच्या सेवन हिल्स रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात होते. ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेननं आतापर्यंत 50 देशांमध्ये हल्ला केला आहे. देशात १८७ केसेस सापडल्या आहेत. तर त्यापैकी १३ रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याचे दिसून आलं आहे.
गेल्या २४ तासात कोरोना रुग्णांची हादरवणारी आकेडवारी आली समोर
महाराष्ट्रात काल ९ हजार ८५५ कोरोना रुग्ण समोर आले असून यामुळे राज्यभरात खळबळ निर्माण झाली आहे. यामुळे ४२ लोकांना मृत्यू सामना करावा लागला आहे. सध्या राज्यात मृत्यूदर हा २.४० टक्के आहे. राज्यात ६ हजार ५५९ कोरोना रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. यामुळे कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा रिकव्हरी रेट ९३.७७ आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेसमध्ये ८२ हजार ३४३ एक्टिव्ह रुग्ण आहेत.
पुण्यात वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या
पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये(Pune corona Cases) कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात जवळपास १ हजार ७१४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासनानं जनतेला मास्कचा वापर करण्याचे आवाहन केलं असून सरकारनं या गोष्टींना गांभीर्यानं घेतलं आहे. धक्कादायक! लस घेतल्यानंतर काही महिन्यातच महिलांच्या छातीत विकसित झाल्या सुजेच्या गाठी; तज्ज्ञ सांगतात की....
नागपुरात वाढतोय कोरोनाचा धोका
नागपुर (Nagpur Corona Cases) शहरात कोरोनाच्या केसेसमध्ये कमतरता आढळली असून गेल्या २४ तासात १ हजार १५२ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर ६ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. शहरात आतापर्यंत ४ हजार ३५७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर शहरात एकूण रुग्णांची संख्या ९ हजार २९५ आहे. सावधान! कोरोना संक्रमित लोकांनी चुकूनही करू नये या औषधाचं सेवन; WHO चा इशारा