शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

सामान्य समजत असाल बद्धकोष्ठतेची समस्या तर करताय मोठी चूक! होतील 'हे' घातक आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 11:44 AM

बद्धकोष्ठता (Constipation Home Remedies )त्रास म्हणजे कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे आणि मलत्याग करताना त्रास होणे. हा त्रास होण्यासाठी कोणती कारणे असतात? त्यावर उपाय काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

निरोगी आरोग्यासाठी ज्याप्रमाणे पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे शरीराची हालचाल होणं देखील गरजेचं आहे. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यासाठी व्यायाम, योगासनं नियमित करणंही आवश्यक आहे. सकस आहाराचा अभाव आणि शरीराची हालचाल न झाल्यानं पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास देखील होऊ शकतो. बद्धकोष्ठता (Constipation Home Remedies )त्रास म्हणजे कठीण स्वरुपात शौचास होणे, पोट स्वच्छ न होणे आणि मलत्याग करताना त्रास होणे. हा त्रास होण्यासाठी कोणती कारणे असतात? त्यावर उपाय काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

बद्धकोष्ठतेची कारणे

  • हालचाल कमी असणे
  • पौष्टिक आहाराचा अभाव
  • वजन कमी किंवा जास्त असणे
  • मानसिक विकारांमुळे हा त्रास होऊ शकतो
  • कॅल्शियमयुक्त पदार्थांचे अतिरिक्त सेवन
  • पोटाचे सर्वच विकार
  • शरीरात पाण्याची कमतरता असणे
  • दुधाच्या सेवनाचा अभाव
  • अंमली पदार्थांचे व्यसन
  • अति प्रमाणात चहा आणि कॉफी पिणे
  • बदलती जीवनशैली, बैठ्या स्वरुपातील कामे
  • उच्च रक्तदाब आणि डिप्रेशनवर सुरू असलेल्या औषधोपचारांमुळेही हा त्रास उद्भवू शकतो

 

बद्धकोष्ठता कशी टाळावी

फायबरमुळे पोट स्वच्छ होतेबद्धकोष्ठतेचा त्रास लहानांपासून ते वयोवृद्धांमध्येही आढळतो. हा त्रास कमी करण्यासाठी फायबरयुक्त आहाराचे सेवन करावे.फायबरयुक्त पदार्थांमुळे शरीराची पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. फायबरच्या सेवनामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यामुळे पचन प्रक्रियेवर कोणताही ताण येत नाही. अन्नपदार्थांचे पचन सहजरित्या होण्यास मदत मिळते.

​जास्त प्रमाणात पाणी प्याघरामध्ये असताना आपलं पाणी पिण्याचे प्रमाण अतिशय कमी असते. पण ही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीनं योग्य नाही.दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. घरात असतानाही जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे शरीराची झालेली झीज भरून निघते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी घटक लघवी आणि मलाद्वारे बाहेर फेकले जातात.​

अळशीच्या सेवनाने फायदा होतोअळशीच्या बिया मिक्सरमध्ये वाटून पावडर तयार करून घ्या. अळशीच्या बियांची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून ठेवा. तीन ते चार तासांना हे पाणी गाळून घ्या आणि प्या. डॉक्टरांकडून अळशीच्या पावडरचे सेवन करण्याचे प्रमाण विचारून घ्या. अळशीच्या बियांमध्ये सॉल्युबल फायबर चे घटक आहेत. बद्धकोष्ठतेच्या त्रासावर अळशीच्या बिया रामबाण उपाय आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट चे प्रमाण कमी असते. ज्यामुळे पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. अळशीमध्ये कित्येक अँटीऑक्सिडेंट्स असतात. ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स देखील संतुलित राहण्यास मदत होते.

​मधाचे सेवनही फायदेशीरएक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्ध्या लिंबूचा रस मिक्स करून प्या. मध शरीरासाठी पोषक आहे. बद्धकोष्ठतेच्या त्रासावर मध हा प्रभावी घरगुती उपाय आहे. आयुर्वेदामध्ये मधास अतिशय महत्त्व आहे. कित्येक औषधांमध्ये मधाचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये मधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देखील देण्यात आला आला आहे. मधामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी - मायक्रोबिअल आणि अँटी - इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

​बद्धकोष्ठतेचा त्रास टाळण्यासाठी करा योगअश्विनी मुद्रा : योग क्रियेमध्ये अश्विनी मुद्रा ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. अश्विनी मुद्रेमुळे हर्निया, गुदद्वारसंबंधीचे आजार, बद्धकोष्ठता इत्यादींचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. अश्विनी मुद्रेमध्ये गुदद्वार आकुंजन करणे आणि त्यानंतर सैल सोडण्याची क्रिया केली जाते. तुम्हाला जमिनीवर किंवा खुर्चीवर बसून ही क्रिया करणे शक्य आहे, त्या पद्धतीनं या योगाभ्यासाचा सराव करावा. पण दोन्ही हात कायम ज्ञान मुद्रेमध्ये असावेत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स