रोजच्या वापरात असलेल्या 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:53 AM2020-01-21T11:53:33+5:302020-01-21T11:53:40+5:30

गेल्या काही वर्षापासून असे अनेक आजार वाढत जात आहेत.

Causes of cancer know which is more dangerous | रोजच्या वापरात असलेल्या 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, वेळीच व्हा सावध

रोजच्या वापरात असलेल्या 'या' गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, वेळीच व्हा सावध

Next

गेल्या काही वर्षांपासून असे अनेक आजार वाढत जात आहेत. ज्यामुळे सगळ्याच वयोगटात गंभीर कारण नसताना जीवघेणे आजार होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. आपण रोजच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांचे सेवन करत असतो. काही गोष्टी आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण घटकात समाविष्ट असतात. पण तुम्हाला याच पदार्थांचे सेवन महागात सुद्धा पडू शकतं.

Image result for cancer

अनेकदा खाण्यापिण्यातून चुकिचे आणि शरीराला अनुकूल नसलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणते पदार्थ तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकतात हे माहीत असणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो.

Image result for cancer
आर्टिफिशियल स्वीटनर्स

Image result for artificial sweeteners

अनेकदा आपल्याला कल्पना नसते. पण शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे  कॅन्सर सुद्धा होऊ शकतो.  रिसर्चकर्त्यांच्यामते  सॅकरीन (Saccharine) मुळे उंदराना कॅन्सर होतो. पण उंदराच्या तुलनेत मानवी  शरीरातील प्रक्रिया वेगळ्या असतात. पण बाहेर किंवा ऑफिसमध्ये आपण आर्टिफिशियल साखरेचे सेवन करत असतो. चहा किंवा कॉफीमध्ये आर्टिफिशीयल शुगरचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या शरीराला कॅन्सरचा धोका असण्याची सुद्धा शक्यता असते. 

एक्स-रे

Image result for x ray

ज्यावेळी तुम्ही दातांच्या दवाखान्यात जाता त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांकडून कव्हर करण्यासाठी एक आवरण दिले जाते. याचं मुख्य कारण म्हणजे एक्सरेमुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते. एक्स-रे चे रेडिएशन  जितक्या जास्त प्रमाणात असतील तितकंच  ते आरोग्यासाठी घातक आणि जीवघेणं सुद्धा ठरू शकतं. 

मोबाईल फोन

Image result for mobile phone

सगळ्यांकडेच सध्या २४ तास मोबाईल असतो. मोबाईलच्या वापराचे आणि रेडीएशन्सचे दुष्परिणाम  माहीत असून सुद्धा  झोपताना अनेक लोक  फोन जवळ ठेवूनत झोपतात. पण नकळतपणे तुमची हीच सवय महागात पडू शकते. म्हणून शक्य असेल तितक्या लांब फोन ठेवण्याचा प्रयत्न करा. हैंड-फ्री डिवाइसचा वापर करा. अन्यथा कॅन्सरसारखा गंभीर आजार या सवयीमुळे होऊ शकतो.

प्रोसेस्ड फुड 

Image result for processed food

( Image credit- food navigator)

सध्याच्या काळात इन्सटंन्ट आणि प्रोसेस्ड फुडचा वापर वाढला आहे. कारण व्यस्त जीवनशैली असल्यामुळे अनेकांना जेवण बनवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणून बाजारात उपलब्ध असलेल्या वेळ वाचवत असलेल्या आहाराचं सेवन सर्वाधिक केलं जातं. त्यात प्रिजर्वेटिव्हस मोठ्या प्रमाणावर असतात.  अनेक पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण सुद्धा खूप असतं. त्यामुळे हा पदार्थांचे सेवन सतत केल्यास रोगप्रतिकाराकशक्ती कमी होऊन कॅन्सरसारखे जीवघेणे आजार होण्याचा धोक जास्त असतो.

प्लास्टिकबंद खाणं

Image result for packed food(image credit- joybynature)

आपण अनेकदा पाणी सुद्धा प्लास्टिकच्या बाटलीने पीत असतो. या प्लास्टीकच्या बॉटलमध्ये बिस्फेनॉल ए सुद्धा असू शकतं.  ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. वेफर्स, बिस्किट्स, केक्स असे अनेक कंपन्यांचे पदार्थ प्लास्टीक मध्ये असता. त्यांना पॅक फुड म्हणतात. असं पॅक फूड खाल्यास जीवघेणा आजार होण्याची शक्यता असते. म्हणूनच शक्य होईल तितकं आहारात प्लास्टिकच्या पाकीटात असलेल्या पदार्थांचा समावेश करू नका. 

Web Title: Causes of cancer know which is more dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.