ब्यूबॉनिक प्लेगमुळे २४ तासात होऊ शकतो मृत्यू; नवी माहामारी पसरण्याचा धोका कितपत?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 07:09 PM2020-07-06T19:09:49+5:302020-07-06T19:11:58+5:30

योग्य उपचार न मिळालयास २४ तासाच्या आत रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो.

Bubonic plague kill adults within 24 hours china epidemic warnings | ब्यूबॉनिक प्लेगमुळे २४ तासात होऊ शकतो मृत्यू; नवी माहामारी पसरण्याचा धोका कितपत?

ब्यूबॉनिक प्लेगमुळे २४ तासात होऊ शकतो मृत्यू; नवी माहामारी पसरण्याचा धोका कितपत?

Next

उत्तर चीनमध्ये मंगोलियाच्या काही भागात ब्यूबॉनिक प्लेगच्या केसेस समोर आल्यानंतर या माहामारीबाबत धोक्याची सुचना दिली जात आहे. ब्यूबॉनिक प्लेग हा खूप घातक आणि जीवघेण्या स्वरुपाचा आजार असून योग्य उपचार न मिळालयास २४ तासाच्या आत रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. आम्ही तुम्हाला हा आजार माहामारीत बदलण्याची किती शक्यता आहे. याबाबत सांगणार आहोत. 

आधीच  चीनसह जगभरात कोरोना व्हायरसच्या माहामारीने हाहाकार निर्माण केला असताना आता ब्यूबॉनिक प्लेग या नवीन आजाराचे रुग्ण समोर आले आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार  शनिवारी मंगोलियाच्या बयानुरमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले. आता या रुग्णांची स्थिती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 

ब्यूबॉनिक प्लेग 24 घंटे में ले सकती है जान, नई महामारी फैलने का कितना खतरा?

हा आजार बॅक्टेरियांच्या संक्रमणामुळे पसरत आहे. मंगोलियामध्ये  मॅरमोटचे मास खाल्यामुळे हा आजार पसरला असल्याचे सांगितले जात आहे. एकेकाळी सगळ्यात  घातक आजारांमध्ये या माहामारीची गणती होत होती. पण आता या आजारावर उपचार उपलब्ध आहेत. पण वेळेवर उपचार न मिळाल्यास २४ तासांच्या आत मृत्यू होऊ शकतो. बीबीसीच्या रिपोर्टनुसार १४ व्या शतकात ब्यूबॉनिक प्लेगमुळे १० कोटी लोकांचा जीव गेला होता. या आजाराला ब्लॅक डेथ असंही म्हटलं जातं. आता पुन्हा एकदा ही माहामारी पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

ब्यूबॉनिक प्लेग या आजारावर उपचार एंटीबायोटिक्सने केला जातो. पण उपचार वेळेवर न मिळाल्यास ३० ते ६० टक्के लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ब्यूबोनिक प्लेगच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, ताप आणि उलट्यांचा समावेश आहे. हेल्थलाइनने दिलेल्या माहितीनुसार स्टँडफोर्ड हेल्थ केअरमधील संक्रमक आजारांचे तज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार  १४ व्या शतकापासून संपूर्ण जगाला या आजाराबाबत माहिती असून संक्रमित रुग्णांच्या उपचारांसाठी एंटीबायोटिक्सचा वापर केला जात आहे. 

जीवाशी खेळ! कोरोना संक्रमित होण्यासाठी 30 हजार लोकांची तयारी...

काळजी वाढली! 'ही' समस्या असलेल्यांना दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण

Web Title: Bubonic plague kill adults within 24 hours china epidemic warnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.