'हे' पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीर होतं आणखी मजबूत, हेल्थ एक्सपर्टनी सांगितले अनेक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 14:50 IST2024-11-04T14:50:04+5:302024-11-04T14:50:52+5:30
Best Food Combination : काही असे खाद्यपदार्थ असतात जे सोबत खाल्ल्याने दुप्पट फायदा मिळतो. कारण एकाची कमतरता दुसरा पदार्थ पूर्ण करतो. आयुर्वेदातही याला फायदेशीर मानलं आहे.

'हे' पदार्थ एकत्र खाल्ल्याने शरीर होतं आणखी मजबूत, हेल्थ एक्सपर्टनी सांगितले अनेक फायदे!
Best Food Combination : खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीराची शक्ती कमी होते आणि आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. जर तुम्ही योग्य आहार घेतला तर आरोग्यही चांगलं राहतं आणि शरीर मजबूत राहतं. काही असे खाद्यपदार्थ असतात जे सोबत खाल्ल्याने दुप्पट फायदा मिळतो. कारण एकाची कमतरता दुसरा पदार्थ पूर्ण करतो. आयुर्वेदातही याला फायदेशीर मानलं आहे.
हेल्थ एक्सपर्ट निशांत गुप्ता यांच्यानुसार, खालीपैकी जेवढेही फूड कॉम्बिनेशन आहेत, ते सगळे अमृतासारखा आहेत. कारण यांच्या सेवनाने शरीर आणि मेंदुची कोणत्याही प्रकारची कमजोरी दूर होते. चला जाणून घेऊ कोणते पदार्थ एकत्र खाल्ले पाहिजे.
बेस्ट फूड कॉम्बिनेशन
भातासोबत दही
दुधासोबत केळी आणि खजूर
चपातीसोबत तूप
ग्रीन टी सोबत लिंबू
हळदीच्या दुधात काळी मिरी
भातासोबत दही खाण्याचे फायदे
तांदळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन आणि कार्ब्स असतात. भातासोबत दही खाल्ल्याने शरीराला कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, प्रोबायोटिक्स, फॉस्फोरस, रायबोफ्लेविन इत्यादी मिळतात. या सर्व पोषक तत्वांमुळे मसल्स, हाडे आणि मेंदुला पोषण मिळतं.
हळदीचं दूध आणि काळी मिरीची फायदे
हळद आणि काळी मिरे दोन्हींमध्ये अॅंटी-मायक्रोबिअल प्रॉपर्टी भरपूर असते. हळदीमध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणही भरपूर असतात. यांचं सेवन केल्याने सर्दी-खोकला दूर होतो, तसेच इम्यून सिस्टमही मजबूत राहतं. ज्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा धोका टळतो.