तळपायांची आग आणि भेगांमुळे होणारी वेदना दूर करण्याचा खास उपाय, एकदा कराच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 10:31 AM2024-06-15T10:31:04+5:302024-06-15T10:31:41+5:30

feet burning : तळपायाची आग आणि टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी एक खास उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोरफड, दही आणि खोरऱ्याच्या तेलाची गरज पडेल.

Best Ayurveda remedies for reducing feet burning | तळपायांची आग आणि भेगांमुळे होणारी वेदना दूर करण्याचा खास उपाय, एकदा कराच!

तळपायांची आग आणि भेगांमुळे होणारी वेदना दूर करण्याचा खास उपाय, एकदा कराच!

feet burning :  अनेक लोकांना तळपायाची आग होणे किंवा टाचांना भेगा पडणे अशा समस्या होत असतात. टाचांना भेगा पडण्याची समस्या जास्तकरून महिलांना खूप होते. अशात या समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात किंवा औषधं घेतात. पण सगळ्यांना फायदा होतोच असं नाही. अशात काही आयुर्वेदिक उपाय फार फायदेशीर ठरतात. समस्या दूर होण्यास थोडा वेळ लागू शकतो. पण याने फायदा नक्कीच होतो. तळपायाची आग किंवा भेगा दूर करण्यासाठी असाच एक उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

arogyadai_aurved नावाच्या इन्स्टा पेजवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात तळपायाची आग आणि टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी एक खास उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोरफड, दही आणि खोरऱ्याच्या तेलाची गरज पडेल. चला तर मग जाणून घेऊ कसा कराल हा उपाय.

व्हिडीओत सांगण्यात आलं आहे की, तळपायांच्या आकाराचं कोरफडीचं पान घ्या. त्याची एका बाजूने साल आणि काटे काढून टाका. त्यावर थोडं खोबऱ्याचं तेल आणि त्यावर दही पसरवून घ्या. शेवटी हे पाना पट्टीच्या मदतीने चिकटवून घ्या. हा उपाय दहा ते पंधरा दिवस रोज रात्री करावा.

हा उपाय केल्यावर काही दिवसांमध्ये तुम्हाल फरक दिसू लागेल. कोरफडीचं अनेक फायदे आरोग्याला होतात. त्वचेसंबंधी अनेक समस्या याने दूर होतात. कोरफडीचं गर थंड असतो. तसेच दह्याचेही आरोग्याला खूप फायदे होतात. त्यामुळे कोरफड, दही आणि खोबऱ्याच्या तेलाचा हा उपाय एकदा करून बघाच.

Web Title: Best Ayurveda remedies for reducing feet burning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.