फक्त मकरसंक्रांतच नाही तर तीळाचं महत्त्व त्याहीपेक्षा जास्त आहे, काय? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 04:16 PM2022-01-14T16:16:51+5:302022-01-14T16:20:03+5:30

तिळाचा वापर आरोग्यासाठी होतोच सोबतच तिळाचे अनेक फायदे आहेत. अगदी तिळाचा त्वेचासाठी सुद्धा फायदा आहे. हिवाळ्यात त्वेचा कोरडी होते अशावेळी तिळाचा सौंदर्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी फायदा होतो.

benefits of sesame during winter season tips to use it | फक्त मकरसंक्रांतच नाही तर तीळाचं महत्त्व त्याहीपेक्षा जास्त आहे, काय? घ्या जाणून

फक्त मकरसंक्रांतच नाही तर तीळाचं महत्त्व त्याहीपेक्षा जास्त आहे, काय? घ्या जाणून

Next

तिळाचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो. तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तिखट चटणीपासून गोड पदार्थ बनविण्यासाठी तिळाचा वापर केला जातो. तिळामध्ये पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक आहेत. जे आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. तिळाचा वापर आरोग्यासाठी होतोच सोबतच तिळाचे अनेक फायदे आहेत. अगदी तिळाचा त्वेचासाठी सुद्धा फायदा आहे. हिवाळ्यात त्वेचा कोरडी होते अशावेळी तिळाचा सौंदर्यासाठी आणि केसांची निगा राखण्यासाठी फायदा होतो.

तिळाचा तेलाचा हिवाळ्यात जबरदस्त फायदा होतो. त्वचा मुलायम आणि सुंदर दिसण्यासाठी तिळाच्या तेलाचा खूप फायदा होतो. आठवड्यातून 2 वेळा तरी आंघोळीला जाण्यापूर्वी तिळाच्या तेलाचा मसाज करा. तिळाचं तेल गरम असल्याने त्याने शरीराला मसाज केल्यास रक्तप्रवाह चांगला होतो. तसंच त्वचा मऊ आणि मुलायम होते. तिळाच्या तेलाने मसाज केल्यावर साधारण एक तासाने गरम पाण्याने आंघोळ करा.

केसासाठी तिळाचं तेल उत्तम
त्वचेसाठी जसं तिळाचं तेल फायदेशीर आहे तसंच केसासाठी तिळाचं तेल उत्तम आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यामुळे केसात कोंडा होतो आणि केस कोरडे राठ वाटतात. अशावेळी हिवाळ्यात केसांना तिळाच्या तेलाने मसाज केल्यास केसाची पोत सुधारते. केसांची मुळं पक्की होतात आणि केस गळण्याची समस्या दूर होते. खोबरेल तेलात तिळाचं तेल मिक्स करा आणि या मिक्स केलेल्या तेलाने केसांमध्ये मसाज करा. साधारण तासाभरानंतर गरम पाण्याने केस धुवून टाका.

तिळाचा स्क्रब म्हणून उपयोग
हो, बरोबर तिळाचा स्क्रब म्हणून खूप चांगला फायदा होतो. तीळ रात्री दुधामध्ये भिजत ठेवा. सकाळी मिक्सरमधून याची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये हळद आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. हा स्क्रब चेहरा आणि अंगाला लावा. या पेस्टने मसाज करा. या स्क्रबमुळे त्वचेवरील काळपटपणा दूर होतो, त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदार दिसते. विशेष तीळ हे उष्ण असतात त्यामुळे ज्यांचं शरीर आधीच अधिक उष्ण असेल त्यांनी तिळाचा वापर कमी करावा.

Web Title: benefits of sesame during winter season tips to use it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app