डायबिटीस, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचं? मग या पदार्थाचे सेवन करा, आजार होतील दूर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 02:17 PM2024-06-06T14:17:20+5:302024-06-06T14:21:24+5:30

आजकाल पाहायला गेलं तर अगदी  कमी वयातच लोकं वेगवेगळ्या आजारांचे शिकार बनत चालले आहेत.  

benefits of eating ragi nachni in diet control problem of cholesterol and good for diabetes | डायबिटीस, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचं? मग या पदार्थाचे सेवन करा, आजार होतील दूर 

डायबिटीस, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवायचं? मग या पदार्थाचे सेवन करा, आजार होतील दूर 

Benefits Of Eating Nachni (ragi) In Diet : आजकाल पाहायला गेलं तर अगदी  कमी वयातच लोकं वेगवेगळ्या आजारांचे शिकार बनत चालले आहेत.  बदलती जीनवशैली हे देखील त्यामागील महत्वाचं कारण आहे. देशभरात हार्ट अटॅक, डायबिटीस यांसारख्या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये थोडाफार बदल केला तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील, असं तज्ज्ञांचं मत आहे. 

साधारपणे २० व्या शतकाच्या पूर्वाधात आपल्या दैंनंदिन आहारामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी,बाजारी तसेच नाचणी यांसारख्या पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा.  हे भारतीय आहारातील महत्वाचे घटक मानले जात होते. नाचणी हे सुपरफूड आरोग्याचं भांडार आहे. शिवाय नाचणी फायबर आणि इतर पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. नाचणीत कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, प्रोटीन्स, पॉलिसॅच्युरेडे फॅट्स असतात. नाचणी अनेक प्रकारच्या क्रोनिक आजारांपासून बचाव करते. त्यामुळे डायबिटीस, कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी रोजच्या जेवणात नाचणीचा समोवश करा, असं डॉक्टरही सांगतात. चला तर मग जाणून घेऊया डायबिटीस, कोलेस्ट्रॉल कंट्रोल कसा करावा त्यासोबतच आहारात नाचणी कशा पद्धतीने समाविष्ट करावी. 

नाचणी खाण्याचे फायदे-

१) डायबिटीसवर रामबाण उपाय

डायबिटीस असलेल्या रुग्णांना नाचणीच्या पिठाची भाकरी खाण्याचा सल्ला मिळतो. कारण नाचणी हे फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यात पॉलिफेनॉल, अमीनो ऍसिड आणि खनिजे देखील आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

बऱ्याचदा ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे अशा रुग्णांना नाचणीची भाकरी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. 

२) कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यास फायदेशीर-

नाचणीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. ज्यामुळे ह्रदयरोग संबंधित धोका कमी होतो.  त्यासाठी नाचणीचे लाडू, नाचणीची भाकरी उपयुक्त ठरते. 

Web Title: benefits of eating ragi nachni in diet control problem of cholesterol and good for diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.