शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
3
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
4
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
5
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
6
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
7
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
8
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
9
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
10
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
11
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
13
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
14
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
15
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
16
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
17
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
18
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
19
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
20
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...

आवळ्याच्या बिया आहेत इतक्या फायदेशीर की, फेकुन देताना दहा वेळा विचार कराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 17:03 IST

आवळ्याच्या बियांमध्येही (Indian Gooseberry Seeds) औषधी गुणधर्म असतात. आज आपण आवळ्याच्या बियांच्या गुणधर्माबद्दल जाणून घेणार आहोत.

आपल्याकडे घरगुती उपाय करण्याचे प्रमाण जास्त आहे. घरात वापरले जाणारे फळं, भाज्या, मसाले यांच्यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात. छोट्या छोट्या आजारांवर हे उपयुक्त ठरतात. यातीलच आवळा हे फळ असे आहे, ज्याच्यामध्ये अगणित औषधी गुणधर्म (Medicinal Properties Of Amla) आहेत. आवळा हा विशेषतः केसांच्या मजबूतीसाठी आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी वापरला जातो. मात्र आवळ्यामध्ये यापेक्षाही आणखी खूप औषधी गुणधर्म आहेत. आवळ्याच्या बियांमध्येही (Indian Gooseberry Seeds) औषधी गुणधर्म असतात. आज आपण आवळ्याच्या बियांच्या गुणधर्माबद्दल जाणून घेणार आहोत.

आवळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, पोटॅशियम, कॅरोटीन, लोह आणि फायबर यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक तत्व आढळतात (Amla Seeds Contain Vitamin B Complex, Calcium, Potassium, Carotene, Iron And Fiber.). आवळ्याच्या बिया वाळवून त्याची पावडर तयार केली जाते. ही आवळ्याच्या बियांची पावडर (Amla Seed Powder) अनेक समस्यांवर उपयुक्त ठरते. जर तुम्हाला बद्धकोष्ठता, अपचन (Indigestion) किंवा आम्लपित्ताची समस्या असेल तर आवळ्याच्या बियांपासून बनवलेले पावडर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल (Health Benefits of Amla Seeds). यासाठी हे पावडर कोमट पाण्यात टाकून प्यावे. आवळ्याच्या बियांचा वापर तुम्ही त्वचेशी संबंधित समस्या सोडवण्यासाठीदेखील करू शकता. जर तुम्हाला पिंपळे किंवा मुरुमांची समस्या असेल तर आवळ्याच्या वाळवलेल्या बिया खोबरेल तेलात टाकून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत त्या ठिकाणी लावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होईल.

उन्हाळ्यात आपल्याला अनेक त्रासाचं सामना करावा लागतो. यामध्ये बऱ्याचदा वनकातून रक्त येणे ही समस्या जास्त वाढते. अशा परिस्थितीत आवळ्याच्या बियांपासून बनवलेल्या पावडरची पेस्ट तयार करून ती डोक्याला लावावी. त्यामुळे तुम्हाला अराम मिळतो. बऱ्याचदा मसाल्याचे पदार्थ खाल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे उचकी लागते. ही उचकी थांबवण्यासाठी आवळ्याच्या बियांची पावडर आणि मध एकत्र करून खावा. यामुळे उचकीपासून लवकर आराम मिळतो. आवळा हे फळ विविध औषधे तयार करण्यासाठी वापरले जाते. आवळ्यापासून तयार केलेली औषधे अशक्तपणा, पिंपल्स, जुलाब, दातदुखी आणि ताप यावर उपचार करण्यासाठी जास्त प्रमाणात वापरली जातात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स