शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Beetroot Benefits : पोषक तत्वाचं 'पावरहाऊस' ठरतं बीट; उन्हाळ्यात बीटाच्या सेवनानं शरीराला मिळतील हे ६ फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 15:55 IST

Beetroot Benefits : कामानिमित्त बाहेर किंवा घरातच व्यस्त असताना पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. अनेकांचे जेवणही वेळेवर होत नाही. अशात जर तुम्ही बीटाचे पदार्थ किंवा कच्चा बीट खाण्याकडे  लक्ष दिल्यास गुणकारी ठरेल. 

वर्षभर बिटाचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. पण जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात आहारात बीटाचा समावेश कराल तर शरीरातील अनेक पोषक घटकांची कमतरता भरून निघते. उन्हाळ्याच्या दिवसात तहान खूप लागते. कामानिमित्त बाहेर किंवा घरातच व्यस्त असताना पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. अनेकांचे जेवणही वेळेवर होत नाही. अशात जर तुम्ही बीटाचे पदार्थ किंवा कच्चा बीट खाण्याकडे  लक्ष दिल्यास गुणकारी ठरेल. चला तर मग जाणून घेऊया बीटाच्या सेवनाचे फायदे.

डायबिटीस नियंत्रणात राहते

डायबिटीस असलेले लोक बीटाचे सेवन बिंधास्त करू शकतात कारण त्यामुळे ब्लड शुगर लेवलसुध्दा वाढत नाही बीटामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो. यामध्ये कॅलरी जास्त असतात आणि हे फॅट फ्री असते. 

एनिमीयाची समस्या कमी होते

ज्या लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता असते. बीटाच्या सेववाने ही कमरता भरून काढता येऊ शकते. त्यासाठी तुम्ही जेवताना बीटाचे काप किवा बीटाचा रस प्यायला सुरूवात करा. याशिवाय बीटाच्या रसात फ्लेवोनोइड्स आणि फाइटोन्यूट्रिएंट्स असतात. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

मासिक पाळीच्या समस्या दूर होतात

मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते. बीटमध्ये फॉलिक एसिड असतं. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असतं. रक्त वाढवण्यात बीट फायदेशीर ठरतं.  

तब्बल ३० वर्षांनंतर महिलेनं उघडलं तोंड; या एका आजारामुळे फक्त द्रव पदार्थांवर होती जीवंत  

सांधेदुखी कमी होते

बीटामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. बीटामध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी1, बी2 आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये कॅलरीज खूप कमी असते. तुम्ही ज्यूस, भाजी, सॅलेडमध्ये बीटाचा समावेश करू शकता.

त्वचेवर असा करा वापर

चेहऱ्यावर जेव्हा मोठ्या प्रमाणात पुटकुळ्या येतात, फोड येतात तेव्हा त्वचेचा असह्य दाह होतो. ही आग शमवण्याचा मोठा गुणधर्म बीटाच्या ज्यूसमध्ये असतो. बीटाचं ज्यूस करतांना त्यात काकडी आणि गाजर घातलं तर बीटाच्या ज्यूसची ताकद आणखी वाढते. बीटाचं ज्यूस रोज प्यायल्यास एकामागोमाग चेहऱ्यावर येणाऱ्या पुटकुळ्यांना अटकाव होतो.

त्वचेवर बीटाचा वापर करण्यासाठी  एलोवेरा जेल आणि २ चमचे व्हिटामीन ई च्या कॅप्सूल आणि बदामाचं तेल एकत्र करा. त्यात एक साल काढलेल्या बीटाचा घट्टरस घाला . हे मिश्रण तयार झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेऊन द्या. हे मिश्रण १५ दिवसांपर्यंत फ्रिजमध्ये राहू शकतं. ही क्रिम आपल्या हातांनी त्वचेवर  गोलाकार फिरवा.

अरे व्वा! पुढच्या काही आठवड्यात भारताला मिळणार तिसरी कोरोना लस; भारतीय कंपनीचा दावा

 चेहरा खराब होऊ नये म्हणून इतर केमिकल्सयुक्त क्रिम वापरण्यापेक्षा बीटाच्या घरगुची क्रिमचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा गुलाबी दिसेल तसंच  मऊ आणि मुलायम दिसेल.  याच मिश्रणात व्हिनेगर घालून जर तुम्ही  पेस्ट तयार केली आणि याचा वापर केसांवर केला तर कोंडा होण्याची समस्या दूर होईल

केसांसाठी बीटाचा उपयोग

बीटामुळे रक्तप्रवाह सुधारतो. केसांची गळती कमी होते. केस वाढतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केसांची क्वॉलिटी सुधारते. बीटामधल्या सिलिका या खनिजामुळे केसांना चमकही येते. 

(टिप- वरिल फायदे आम्ही फक्त वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास उत्तम ठरेल?) 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यfoodअन्नSkin Care Tipsत्वचेची काळजीHair Care Tipsकेसांची काळजी