लहान मुलांसाठी सरकारकडून 'इम्युनिटी बुस्टर किट', फ्री वाटप होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 11:51 AM2021-10-01T11:51:04+5:302021-10-01T12:08:59+5:30

कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. यासाठीच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रतिकारशक्ती वाढवणारं 'बाल रक्षा किट' विकसित केलं आहे.

ayush ministry launch immunity booster kit for kids to fight covid | लहान मुलांसाठी सरकारकडून 'इम्युनिटी बुस्टर किट', फ्री वाटप होणार

लहान मुलांसाठी सरकारकडून 'इम्युनिटी बुस्टर किट', फ्री वाटप होणार

googlenewsNext

कोरोना व्हायरसची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. यासाठीच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी प्रतिकारशक्ती वाढवणारं 'बाल रक्षा किट' विकसित केलं आहे. AIIA आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे किट कोरोना संसर्गाशी लढण्यास आणि मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करेल.

काय आहे या किटमध्ये?
आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, किटमध्ये अनु तेल, सीतोपलादी आणि च्यवनप्राश आहे. याशिवाय तुळस, गिलोय, दालचिनी, मद्य आणि वाळलेल्या द्राक्षांपासून बनवलेलं सिरप, ज्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आहेत.

या पदार्थांच्या नियमित सेवनाने मुलांची प्रतिकारशक्ती वाढते. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे किट आयुष मंत्रालयाच्या कडक मार्गदर्शक तत्त्वांनुसार बनवण्यात आलं आहे. हे उत्तराखंडमधील स्थित प्लांटमध्ये भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या इंडियन मेडिसीन्स फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड (IMPCL) द्वारे तयार केलं गेलं आहे.

१० हजार किट फ्रीमध्ये वाटणार
२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्था १० हजार किटचं मोफत वाटप करणार आहे. भारतात अद्याप मुलांसाठी कोविडची लस उपलब्ध नाही, त्यामुळे मुलांचे आरोग्य लक्षात ठेवून बाल संरक्षण किट महत्त्वाची ठरू शकते.

एआयआयएच्या संचालिका डॉ. तनुजा नेसरी म्हणाल्या की, मुलांना अनेकदा काढे आणि गोळ्या घेण्यात अडचण येते. हा काढे कडू असल्याने मुलांना घेणं कठीण आहे. त्यामुळे असे काढ्याचं सिरप तयार करण्यात आलं आहे. ज्यात सर्दी आणि खोकला टाळण्यासाठी इतर काही औषधंही मिसळण्यात आली आहेत.

लहान मुलांना द्यावं 'स्वर्ण प्राशन'
डॉ नेसरी म्हणाले, 'राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त ५ हजार मुलांना सुवर्ण प्राशन किटसह दिले जाईल. यासाठी आम्ही दिल्लीच्या शाळांशी आधीच संपर्क साधला आहे. ते म्हणाले की, सुवर्ण प्राशन मुलांचं एकूण आरोग्य सुधारण्यास मदत करते. AIIA ने 'स्वास्थ रक्षा किट', 'आरोग्य रक्षा किट' आणि 'आयु रक्षा किट' तयार केलं आहेत.

Web Title: ayush ministry launch immunity booster kit for kids to fight covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.