एका झटक्यात शरीरातील कचरा निघेल बाहेर, बाबा रामदेव यांनी सांगितला खास उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 13:00 IST2024-02-28T13:00:12+5:302024-02-28T13:00:59+5:30
आपलं शरीर तेव्हाच चांगलं काम करेल जेव्हा त्यातील कचरा किंवा विषारी पदार्थ कमी होतील आणि ब्लडपासून ते त्वचेचे सेल्स साफ होतील.

एका झटक्यात शरीरातील कचरा निघेल बाहेर, बाबा रामदेव यांनी सांगितला खास उपाय
आपल्या शरीरात वेगवेगळ्या समस्या झाल्या तर आपण औषध घेतो. तसंच आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याची गरज असते. याने शरीर आतून साफ होतं. शरीर वेळोवेळी डिटॉक्स करणं गरजेचं असतं. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, आपलं शरीर तेव्हाच चांगलं काम करेल जेव्हा त्यातील कचरा किंवा विषारी पदार्थ कमी होतील आणि ब्लडपासून ते त्वचेचे सेल्स साफ होतील.
डिटॉक्स प्रोसेसमध्ये डाएटमध्ये बदल आणि लाइफस्टाईलमध्ये बदल करण्याचा सल्ला दिला जातो. अशात योग गुरू बाबा रामदेव यांनी एक रामबाण उपाय सांगितला आहे. जो शरीर डिटॉक्स करण्याच्या कामी येतो. चला जाणून घेऊ त्याबाबत...
बाबा रामदेव यांच्यानुसार, तुळशीच्या पानांचा ज्यूस बॉडी डिटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरतो. रामदेव बाबा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सांगितलं की, एक ग्लास पाण्यात तुळशीच्या बीया रात्रभर भिजवून ठेवा. त्यात कलौंजी जिरे मिक्स करा आणि सकाळी हे गाळून रिकाम्या पोटी प्यावे.
बाबा रामदेव यांच्यानुसार, याने शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर येतील आणि तुम्हाला ऊर्जावान वाटू लागेल. तुळशीच्या बीया आणि पानांचं चूर्ण कफ-वात दोष कमी करण्यास, पचन शक्ती आणि भूक वाढवणयासोबतच रक्त साफ करण्यासही फायदेशीर असतं.