आरोग्यसंबंधी नवीन गाइडलाइन, लहान मुलांसाठीही आहे गरजेची!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 11:21 AM2018-11-26T11:21:45+5:302018-11-26T11:23:14+5:30

एकाच जागेवर बसून तासंतास काम करणे आपल्या आरोग्यसाठी चांगलं नाहीये, हे अनेक शोधातून समोर आलं आहे.

Any kind of physical activity is beneficial for you | आरोग्यसंबंधी नवीन गाइडलाइन, लहान मुलांसाठीही आहे गरजेची!

आरोग्यसंबंधी नवीन गाइडलाइन, लहान मुलांसाठीही आहे गरजेची!

Next

(Image Credit : ori-healthy.com)

एकाच जागेवर बसून तासंतास काम करणे आपल्या आरोग्यसाठी चांगलं नाहीये, हे अनेक शोधातून समोर आलं आहे. चालण्या-धावण्याचे फायदे तर अनेकांनी ऐकले असतील पण फिट राहण्यासाठी केवळ जिममध्येच एक्सरसाइज केली पाहिजे, असं गरजेचं नाही. कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल ही तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. अमेरिकन सरकारने त्यांच्या नागरीकांसाठी नवीन हेल्थ गाईडलाइन जारी केली आहे. अमेरिकेतील आणि भारतातील वातावरण आणि जीवनशैलीमध्ये बराच फरक असला तरी यातून भारतीयांनीही आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शिकण्यासारखं आहे.   

अमेरिकेने याआधी त्यांच्या नागरीकांसाठी अशीच हेल्थ गाइडलाइन १० वर्षांपूर्वी जारी केली होती. आता ही हेल्थ गाइडलाइन अपडेट करण्यात आली आहे. या दरम्यानच्या काळात आरोग्यासंबंधी अनेक गोष्टींमध्ये बदलही झाले आहेत. त्यानुसार यात बदल करण्यात आले आहेत. आता फिजिकल एक्सरसाइज, वर्कआउट, पायऱ्यांचा वापर करण्याचा फायदा आधीपेक्षा आता जास्त आहे. चला जाणून घेऊ या गाइडलाइनबाबत....

लहान मुलांसाठी काय?

आजकाल लहान मुलं-मुली जास्तीत जास्त वेळ शाळेत बसलेले असतात किेंवा घरी टीव्ही किंवा मोबाइलवर व्हिडीओ बघत असतात. हे त्यांच्या फिटनेससाठी चांगलं नाहीये. जुन्या गाइडलाइनमध्ये असं म्हटलं होतं की, ६ वर्षांच्या वयात  लहान मुला-मुलींना फिजिकल एक्सरसाइजची सवय लावली गेली पाहिजे. पण नव्या गाइडलाइननुसार, ही सवय त्याही आधी लावण्याची गरज आहे. ३ वर्ष वय असताना लहान मुलांना जास्तीत जास्त फिजिकल अॅक्टिव करायला पाहिजे. त्यांना खेळण्यासाठी बाहेर पाठवलं पाहिजे. त्यांनी कमीत कमी ३ तास खेळू द्यायला हवं. तसेच ६ ते १७ वयोगटातील मुला-मुलींना कमीत कमी १ तास वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल अॅक्टिविटीमध्ये वेळ घालवायला हवा. या अॅक्टिविटी बाहेर मोकळ्या जागेत असाव्यात.

मोठ्यांसाठी काय?

मोठ्यांनी कमीत कमी २ ते ५ तास फार जड नसलेल्या एक्सरसाइज कराव्यात. त्यासोबतच आठवड्यातून कमीत कमी २ दिवस मांसपेशींसाठी एक्सरसाइज केली पाहिजे. त्यात पुशअप्स किंवा वेटलिफ्टिंगचा समावेश करावा. कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल किंवा मेहनत तुमच्यासाठी फायदेशीरच आहे. याने ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी आणि भीती दूर करण्यासाठीही मदत मिळते. 

ही माहिती अमेरिकन नागरीकांसाठी असली तरी भारतीय नागरीकही याचा फायदा घेऊ शकतात. भारतात बदलत्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकाला काहीना काही समस्या भेडसावत आहे. अशात आरोग्याची काळजी घेणे, त्यासाठी वेळ देणे गरजेचे ठरत आहे. त्यामुळे कितीही काम असतं तरी एक्सरसाइजसाठी वेळ काढणे महत्त्वाचे ठरेल.

Web Title: Any kind of physical activity is beneficial for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.