रडावंस वाटत असेल तर मनमोकळेपणानं रडा; अश्रूंना रोखल्यानं आरोग्यावर 'असा' होतो परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2020 16:17 IST2020-09-06T15:58:06+5:302020-09-06T16:17:25+5:30
अनेकजण आपल्या अश्रूंना मोकळी वाट न देता आतल्या आत कुढतात. त्यांना कोणाजवळही व्यक्त व्हायला आवडत नाही. पण अश्रूंना आतल्याआत रोखल्यानं शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता असते.

रडावंस वाटत असेल तर मनमोकळेपणानं रडा; अश्रूंना रोखल्यानं आरोग्यावर 'असा' होतो परिणाम
(image Credit- cenegenics, Unity Point health)
माणसाला कोणत्याही गोष्टीबाबत दु:ख होतं तेव्हा अश्रू बाहेर येऊ लागतात. दैनंदिन आयुष्य जगत असताना अनेक घरच्यांच्या बोलण्यामुळे, वरिष्ठांच्या बोलण्यामुळे कधी मित्रांमधील वाद कधी सोशल मीडियावरील संवादादरम्यान त्रासदायक प्रसंग ओढावणं यामुळे रडावसं वाटतं. पण अनेकजण आपल्या अश्रूंना मोकळी वाट न देता आतल्या आत कुढतात. त्यांना कोणाजवळही व्यक्त व्हायला आवडत नाही. पण अश्रूंना आतल्याआत रोखल्यानं शारीरिक समस्या वाढण्याची शक्यता असते.
'जर्नल फ्रंटियर्स इन साइकोलॉजी' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार जे लोक रडतात तेच सर्वाधिक सकारात्मक विचार करू शकतात. अमेरिकेतील मिनासोटा युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्रज्ञांद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासात नमुद करण्यात आलं होत की. जेव्हा तुम्ही तुमच्या अश्रूंना रोखता तेव्हा ताण-तणाव जास्त येतो. आज आम्ही तुम्हाला अश्रूंना रोखल्यास कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. याबाबत सांगणार आहोत.
अश्रू रोखल्यानं जास्त ताण तणाव येतो
जेव्हा तुम्ही अश्रू रोखण्याचा प्रयत्न करता तेव्हा मानसिक ताण येण्याची शक्यता असते. रडण्यावर नियंत्रण ठेवल्यास हार्मोन्सचं असंतुलन होऊन मानसिक दबाव वाढतो. म्हणून मानसिक त्रास होत असल्यास मनात साठवून ठेवण्यापेक्षा मनमोकळेपणानं रडा.
हृदयाच्या ठोक्यांवरही परिणाम होतो
जास्त ताण तणाव आल्यास हृदयावरही परिणाम होतो. हृदयाकडून रक्त जलदगतीनं शरीराच्या विविध अवयवांपर्यंत पोहोचते. यामुळेच अनेकदा हात पायांचे तापमान जास्त असते.
श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो
जर एंग्जाईटी अटॅक येत असेल तर ताण तणाव वाढतो. हात पायांचे तापमान वाढून श्वास घ्यायला त्रास होतो. अनेकदा वेगानं श्वास घेण्याची क्रिया होते.
एंग्जायटी
हृदयाचे ठोके वाढणं हे एंग्जायटीची समस्या असलेल्या लोकांसाठी घातक ठरू शकतं. अशा स्थितीत पॅनिक अटॅक येऊन शारीरिक स्थिती बिघडण्याची शक्यता असते. अनेकदा मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे अश्रूंना रोखण्यापेक्षा मनमोकळेपणानं रडल्यास शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करण्यापासून वाचता येऊ शकतं.
हे पण वाचा-
लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा
घरी असताना किंवा बाहेर अचानक BP Low झाल्यास; त्वरित करा 'या' पदार्थांचे सेवन
आरोग्यदायी आवळ्याच्या रसाचे 'हे' ५ फायदे वाचून अवाक् व्हाल; स्वतःसह कुटुंबही राहील निरोगी