Health Tips Marathi : Know Benefits of aamla Juice | आरोग्यदायी आवळ्याच्या रसाचे 'हे' ५ फायदे वाचून अवाक् व्हाल; स्वतःसह कुटुंबही राहील निरोगी

आरोग्यदायी आवळ्याच्या रसाचे 'हे' ५ फायदे वाचून अवाक् व्हाल; स्वतःसह कुटुंबही राहील निरोगी

कोरोनाकाळात प्रत्येकालाच आजारी पडण्याची भीती वाटते. आवळ्याचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.  सध्या देशात कोरोनासारख्या महामारीचे संकट ओढावले. अशा गंभीर आजारांविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचं  आहे. शरीरास पोषक असणाऱ्या तसेच मोसमाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या फळ-भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यापैकीच एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा.

शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात

छोट्या असलेल्या या फळामुळे शरीर शुद्ध (Detox) होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. 

हाडं मजबूत  होतात

आवळा सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. आवळ्यात मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटीस आणि हाडांचे प्रॉब्लेम यामध्ये अराम मिळतो.

डोळ्यांना फायदेशीर 

आवळ्याच्या रस नियमितपणे सेवन केल्याने याचा फायदा डोळ्यांना नक्कीच होऊ शकतो. मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाईंडनेस यासारखे आजार दूर होतात.

मधूमेह

मधुमेहाच्या समस्येवर आवळा गुणकारी आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्व मोठया प्रमाणावर असतात. यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते.

कॉलेस्ट्रॉल

आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त राहते. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो.

हे पण वाचा-

दिलासादायक! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची 'नोवावॅक्स' लस ठरली सुरक्षित; चाचणीनंतर तज्ज्ञांचा दावा

coronavirus: कोरोना लसीसाठी कोव्हॅक्स योजना, ७६ देश सहभागी

'या' ६ प्रकारच्या समस्या असल्यास नुकसानकारक ठरू शकतं हळदीचं सेवन; वेळीच तब्येत सांभाळा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health Tips Marathi : Know Benefits of aamla Juice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.