'या' ६ प्रकारच्या समस्या असल्यास नुकसानकारक ठरू शकतं हळदीचं सेवन; वेळीच तब्येत सांभाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 03:04 PM2020-09-04T15:04:31+5:302020-09-04T15:10:51+5:30

हळदीच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढत असली तरी कोणत्यावेळी  हळदीचे सेवन करणं टाळावं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

Use of turmeric may be harmful for these people side effects of haldi powder | 'या' ६ प्रकारच्या समस्या असल्यास नुकसानकारक ठरू शकतं हळदीचं सेवन; वेळीच तब्येत सांभाळा

'या' ६ प्रकारच्या समस्या असल्यास नुकसानकारक ठरू शकतं हळदीचं सेवन; वेळीच तब्येत सांभाळा

Next

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की हळदीचं सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. अनेक औषधी गुणधर्म  हळदीत असतात. पण काही स्थितीत हळदीचं सेवन केल्यानं साईड इफेक्ट्सचा सामना करावा लागू शकतो. हळदीच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढत असली तरी कोणत्यावेळी  हळदीचे सेवन करणं टाळावं याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

ज्या लोकांचे डायबिटीजचे उपाचार चालू असतात. ज्यांना नेहमी रक्त पातळ करण्याची गोळी दिली जाते. सतत रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाीठीही औषधाचं सेवन करावं लागतं. अशा स्थितीत हळदीचे सेवन जास्त प्रमाणात केल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण अधिक वाढतं. त्यामुळे हळद जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीराला नुकसान पोहोचू शकतं. 

ज्या लोकांना काविळचा आजार असतो त्यांनी हळदीचे सेवन करू नये. आजार बरा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं हळदीचे सेवन करू शकता. काविळ असताना हळदीचा आहारात समावेश केल्यास तब्येत बिघडण्याची शक्यता असते. ज्या लोकांना अनेकदा किडनी स्टोनची समस्या उद्भवते त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय  हळदीचे सेवन करू नये. त्यांना पित्ताशयात (Gall bladder) स्टोनचा त्रास असतो त्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. 


ज्या लोकांच्या नाकातून अचानक रक्त येण्याची समस्या उद्भवते. त्यांनीही  योग्य प्रमाणातच हळदीचे सेवन करायला हवं. रक्तस्त्रावाशी संबंधीत कोणताही आजार (Epistaxis) असल्यास हळदीचे सेवन करू नका. कारण हळदीचं जास्त प्रमाणात सेवन केल्यानं अनेकदा रक्त जमा होऊन रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची शक्यता असते.

रक्त पातळ करण्याची औषध घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं हळदीचे सेवन करा. ज्या महिलांना एनीमिया म्हणजेच शरीरात रक्ताची कमतरता असते. त्यांनीही हळदीचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. कारण हळदीचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास शरीरात आयर्नचं प्रमाण कमी होतो. त्यामुळे रक्तप्रवाहावर वाईट परिणाम होतो. 

गर्भवाती महिलांनीही डॉक्टरचा सल्ला न घेता हळदीचे सेवन जास्त प्रमाणात करू नये. जर तुम्हाला बाळासाठी प्लॅनिंग करत असाल तर हळदीचे सेवन नियंत्रणात असायला हवं कारण हळदीच्या जास्त सेवनाने शरीरातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं. हळद शरीराल गरम पडते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठीही हळद परिणामकारक ठरते. पण योग्य प्रमाणात सेवन केल्यावरच तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

हे पण वाचा-

दिलासादायक! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची 'नोवावॅक्स' लस ठरली सुरक्षित; चाचणीनंतर तज्ज्ञांचा दावा

coronavirus: कोरोना लसीसाठी कोव्हॅक्स योजना, ७६ देश सहभागी

Web Title: Use of turmeric may be harmful for these people side effects of haldi powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.