लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 01:02 PM2020-09-06T13:02:30+5:302020-09-06T13:12:24+5:30

CoronaVirus News & latest Updates : या माहामारीला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे संशोधन सुरू आहे.

New study claims phytochemicals in plant extracts can fight coronavirus | लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा

लढ्याला यश! झाडांमधील रासायनिक तत्वाने कोरोना विषाणू नष्ट होणार; भारतीय तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

कोरोना व्हायरसनं गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जगभरात हाहाकार निर्माण केला आहे. या जीवघेण्या व्हायरसशी लढण्यासाठी आतापर्यंत कोणतंही खास औषध किंवा लस लॉन्च करण्यात आलेली नाही. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. या माहामारीला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील अनेक देशांचे संशोधन सुरू आहे. भारतातील युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी  कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्याबाबत दावा केला आहे. झाडाझुडूपांमधील केमिकल्सनं  कोरोना व्हायरसवर मात करता येऊ शकते. हे संशोधन  गुरू गोविंद युनिव्हर्सिटी(GGSIPU)  आणि  पंजाब युनिव्हर्सिटीमधील (PU)  प्राध्यापकांनी केलं आहे.

या संशोधनातून काय सिद्ध झाले

PU  सेंटर ऑफ बायोलॉजी सिस्टम्सचे प्रमुख आणि डॉक्टर अशोक कुमार तसंच GGSIPU चे डॉक्टर सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार  झाडांमध्ये ५० पायथोकेमिकल्स असतात. ज्यामुळे व्हायरसचा खात्मा करता येऊ शकतो.  पायथोकेमिकल्स झाडाचे असे तत्व आहे  जे  पानं, फळं, भाज्या, मुळं किंवा इतर भागांमध्ये असते. या तत्वांवर रासायनिक प्रक्रिया करून त्यानंतर वापरात आणता येऊ शकतं. या संशोधनातून दिसून आले  की पायथोकेमिकल्स माणसांना व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या संक्रमणापासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरतात.  

वन्य जीवांवर परिक्षण केलं जाईल

डॉक्टर सुरेश यांनी दिलेल्या माहितीनुसार या संशोधनातून दिसून आलं की, रासायनिक तत्व कोरोना प्रोटीन्सवर आक्रमण करून त्यांना वाढण्यापासून रोखतात. कोरोना प्रोटिन्स इतर प्रोटिन्सच्या संपर्कात आल्यास निष्क्रिय झाल्याने संक्रमण पसरण्याचा धोका कमी होतो. हे परिक्षण कंम्प्यूटर मॉडेलवर करण्यात आलं होतं. यापुढील परिक्षण वन्यजीवांवर आणि माणसांवरही केलं जाणार आहे. त्यानंतर ही झाडांमधील  रासायनिक तत्व कोरोनाचा सामना करण्यासाठी किती प्रभावी ठरतात हे पाहिलं जाईल. हे संशोधन ३ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय नियतकालिक फायटोमेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. 

कोरोना लसीचे व्यापक लसीकरण २०२१ च्या मध्यापर्यंत अशक्य

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी याआधीही लसीबाबत चिंतानजनक स्थिती असल्याचे मत व्यक्त केले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी कोरोना व्हायरसच्या लसीचे मोठ्या प्रमाणात  लसीकरण २०२१ मध्यापर्यंत शक्य नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना WHO च्या या दाव्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनावरील लसींना घाईघाईत परवानग्या दिल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनानं (एफडीए) कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापराच्या परवानग्या देत असल्याचं होतं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला होता.

परिणामकारकता आणि सुरक्षिततेबद्दल पूर्ण खात्री नसलेल्या कोरोना लसींचा वापर केल्यास त्याचे गंभीर साईड इफेक्ट दिसू शकतात. त्यामुळे कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देताना संबंधित प्राधिकरणांनी जबाबदारीनं निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं होतं. अपुऱ्या चाचण्या झालेल्या लसींचा वापर केल्यास कोरोना संकटाचा शेवट होणार नाही. उलट हे संकट आणखी गंभीर होईल. त्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल,' असं स्वामीनाथन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. 

हे पण वाचा-

CoronaVirus : कोरोनाची लस सगळ्यात आधी कोणाला मिळणार? समोर आला तज्ज्ञांचा 'मास्टर प्लॅन'

घरी असताना किंवा बाहेर अचानक BP Low झाल्यास; त्वरित करा 'या' पदार्थांचे सेवन

Web Title: New study claims phytochemicals in plant extracts can fight coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.