शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मायग्रेन फक्त डोक्यातच नाही तर, पोटातही होतो; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 11:09 AM

मायग्रेन म्हटलं की, डोक्याशी म्हणजेच, मेंदूशी संबंधित आजार असं समजलं जातं. या आजारामध्ये रूग्ण डोकेदुखीने अगदी हैराण होऊन जातात. पण तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, डोक्याव्यतिरिक्त मायग्रेनची समस्या पोटामध्येही होते.

मायग्रेन म्हटलं की, डोक्याशी म्हणजेच, मेंदूशी संबंधित आजार असं समजलं जातं. या आजारामध्ये रूग्ण डोकेदुखीने अगदी हैराण होऊन जातात. पण तुम्हाला कदाचित हे ऐकून आश्चर्य वाटेल की, डोक्याव्यतिरिक्त मायग्रेनची समस्या पोटामध्येही होते. खरचं, द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, मायग्रेन पोटातही होतो आणि यामध्येही पोटदुखीने व्यक्ती अगदी हैराण होऊ जाते. पोटात होणाऱ्या मायग्रेनला 'अ‍ॅब्डॉमिनल मायग्रेन' असं म्हणतात. यामध्ये पोटदुखीव्यतिरिक्त थकवा आणि सतत होणाऱ्या उलट्यां यांसारख्या समस्यांचाही सामना करावा लागतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, याप्रकारचा मायग्रेन आनुवांशिक कारणांमुळे होतो. 

(Image Credit : Smart Parenting)

काय आहे अ‍ॅब्डॉमिनल मायग्रेन? 

अ‍ॅब्डॉमिनल मायग्रेन (Abdominal Migraine) हे पोटामध्ये होणाऱ्या मायग्रेनचं वैद्यकिय भाषेतील नाव. हा मायग्रेन मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त होतो. ज्या व्यक्ती आधीपासूनच मायग्रेनच्या समस्येने त्रस्त असतील त्यांच्या मुलांमध्येही या आजाराची लक्षणं आढळून येतात. खासकरून, या मायग्रेनची लक्षणं मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये जास्त आढळून येतात. जर मुलं अ‍ॅब्डॉमिनल मायग्रेन या आजाराने पीडित असतील तर मोठं झाल्यानंतर त्यांना डोक्याशी संबंधित मायग्रेन होण्याची शक्यता आणखी वाढते. 

(Image Credit : FirstCry Parenting)

अ‍ॅब्डॉमिनल मायग्रेनची कारणं...

तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, अ‍ॅब्डॉमिनल मायग्रेन खरं होतो कशामुळे? खरं तर यामागील योग्य कारणं अद्याप कळू शकलेली नाहीत. परंतु अनेक डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, आपल्या शरीरामध्ये तयार होणारे दोन कंपाउंड हिस्टामाइन आणि सेरोटोनिन यासारख्या आजाराचं कारण बनतात. 

शरीरामधील हे कंपाउंड अधिक चिंता करणं आणि डिप्रेशनचं कारण बनतात. अनेकदा चायनिज फूड्स आणि इंस्टंट नूडल्समध्ये वापरण्यात येणारं मोनोसोडिअम ग्लूटामेट, प्रोसेस्ड मीट आणि चॉकलेट जास्त खाल्याने शरीरात हे कंपाउंड्स तयार होतात. या कारणामुळे अ‍ॅब्डॉमिनल मायग्रेनची समस्या होऊ शकते. 

अ‍ॅब्डॉमिनल मायग्रेनची लक्षणं : 

  • पोटामध्ये किंवा नाभिजवळ सतत वेदना होणं
  • पोट पिवळं दिसू लागणं 
  • दिवसभर थकवा, सुस्ती जाणवणं
  • भूक कमी लागणं किंवा सतत खाण्याची इच्छा होणं
  • डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळं तयार होणं

 

(Image Credit : FirstCry Parenting)

अ‍ॅब्डॉमिनल मायग्रेनवर उपचार : 

कारण समजलं नाही तर अनेकदा ही समस्या गंभीर रूप धारणं करते. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्षं करू नका. लक्षणं वेळीच ओळखून डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. जर या समस्येने गंभीर रूप धारण केलं तर यावर उपचार करणं अगदी कठिण होऊन जातं. अनेकदा याची लक्षणं ओळखल्यानंतर तज्ज्ञ यावर उपचार सामान्य मायग्रेनप्रमाणे करतात. ज्यामुळे अनेकदा रूग्णांना पूर्ण लाभ मिळत नाही. त्यामुळे जेव्हाही या आजाराची लक्षणं मुलांमध्ये दिसून येतील त्यावेळी दुर्लक्षं न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार