शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

जिम पोरा जिम ... उत्साहाने सुरु केलेला व्यायाम थांबण्याची 8 कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 16:20 IST

ओढाताण करुन किंवा दुसऱ्याची कॉपी करुन वेदनादायी व्यायाम करत राहिलो तर कायमस्वरुपी त्रास सहन करावे लागू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या आणि आहारतज्ज्ञांच्या मदतीनेच व्यायामास सुरुवात व सातत्य ठेवणे चांगले.

मुंबई- आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी एकमेव मोफत पर्याय म्हणजे व्यायाम. चालणे फिरणे, पळणे यासाठी तर एक छदामही मोजावा लागत नाही. पण आता पोहणे, टेनिससारखे खेळ, स्केटिंग, यासारख्या व्यायामासाठी थोडी फी देऊन आपण ते सुरु करु शकतो. पण आजकाल 'लाखो दिलोंकी धडकन' हिरो-हिरोइन्सना पाहून त्यांच्यासारखंच व्हायचे वेध सर्वांना लागतात. त्यातून आजूबाजूच्या शेजारपाजाऱ्यांमधील कोणीतरी जिमला जात असतंच त्यामुळे त्यांच्यासारखंच होण्याची धडपडही असते. 

आज जाऊ-उद्या जाऊ असं करत जीमप्रवेश आपण लांबवत राहतो. कधी कंटाळा किंवा कधी नसलेली कामं आपल्याला घरातच बांधून ठेवत राहतात. जीम सुरु करण्याच्या दिवसापर्यंत व्यायामाच्या कपड्यांची खरेदी, शूज, पाण्याची बाटली वगैरेची खरेदी करुन होते. मग एकदा खरंच सीमोल्लंघनाचा दिवस येतो आणि आपण एकदाचे जीममध्ये दाखल होतो. साधारणपणे महिनाभर हा उत्साह सुरु राहतो. सकाळी तासभर जीममध्ये जायचं मग हेल्दी फूडच्या नावाखाली घरीही प्रयोग केले जातात.

 1) मी जीम जॉइन केली हे बऱ्यापैकी सगळ्यांना सांगून होतं. फेसबूकवर फोटो, सेल्फी, स्टेटस टाकूनही समाधान होत नाही मग व्हॉटसअ‍ॅपवर जीमचा फोटो आणि 'डोन्ट डिस्टर्ब', 'इन अ मिटिंग', 'बॅटरी लो' प्रमाणे 'अ‍ॅट जिम' असा कायमस्वरुपी स्टेटस टाकून दिला जातो. पुरेपुर प्रसिद्धी करुन झाल्यावर हळूहळू महिन्याभरामध्येच जीममधले हे मश्रुम एकेक करुन गायब व्हायला लागतात. मग एक दिवस आड, कधी आठवड्यातून दोनदा, मग एकदाच असं करत जीमला जाणं बंद होतं. बर 'अरे! काय सांगू वेळच मिळत नाही जिमला जायला' हे सर्वांचं आवडतं सुरेख कारण मदतीला येत असतंच.

2) तात्पुरत्या काळासाठी जिमला जाण्याची खरी कारणं आपल्याच आळसामध्ये असतात. मला चारपाच दिवसांमध्ये माझ्या शरीरामध्ये बदल हवे असतात. ज्या लोकांना पाहून आपण जीममध्ये येतो तसं आठवड्याभरात आपल्याला व्हायचं असतं. महिनाभर इकडेतिकडे वजनं उचलूनही काही झालं नाही. की मग सरळ तेच बंद करुन टाकण्याचा सोपा उपाय निवडला जातो. पण व्यायाम हा तितका सरळ आणि तुमची स्वप्न तात्काळ साध्य करुन देणारा नसतो. ज्या लोकांना आदर्श मानून तुम्ही व्यायाम करायला लागता त्यांनी काही वर्षे घाम गाळला आहे या सत्याकडे आपण पुरेपूर दुर्लक्ष करतो. त्यांची मेहनत सोडून आपण सोयीस्कररित्या बाकीच्या सर्व गोष्टी उचलत असतो. महिनाभर आळसावलेलं शरीर ढकलत ढकलत कसेबसे जिममध्ये जाणं होतं आपलं स्वप्न कष्टाशिवाय मिळणार नाही हे दिसलं की मग एकेक व्यायाम टाळण्याची एकेक कारणं सुचायला लागतात आणि व्हायचं तेच होतं. पहाटे डोक्यावर घेतलेलं पांघरुण आपल्याला सुदृढ शरीरापासून लांब ठेवायला लागतं.

3) जिमपासून लांब राहण्याचं सगळ्यात विचित्र कारण सांगितलं जातं ते म्हणजे, 'जिम सोडली की माणूस जाड होतो'. या एका वाक्याने लाखो लोक व्यायामापासून दूर राहतात. यामागे खरं कारण आहे ते म्हणजे आपली मानसिकता. केवळ तात्कालिक ध्येयं ठेवून आपण जिमचा विचार करतो. तात्पुरता वजन उतरवणे, लग्नामध्ये चांगलं दिसावं अशी अल्पकालीन स्वप्न लोकांच्या डोळ्यासमोर असतात. व्यायाम हा कधीतरी थांबवायचाच आहे असं आपण मनाशी ठरवलेलं असतं. रोजची झोप, जेवण, खाणं यांच्याप्रमाणे व्यायाम हा चांगल्या आयुष्यासाठी आवश्यक आहे असं कोणालाच वाटत नसतं. त्यामुळे एकेदिवशी व्यायाम थांबवला जाणारच आहे मग तो कराच कशाला असा छान सुटसुटीत विचार केला जातो.

 4) खरंतर व्यायाम हा आपण आपल्यासाठी करायचा असतो. तो कोणाला सांगण्यासाठी नाही ही साधी बाब आपण विसरुन गेलेलो असतो. व्यायाम टाळल्यामुळे मनात येणारी खंत आपण वेळच मिळत नाही वगैरे सांगून झाकायला जातो. परंतु आपल्या व्यायाम करण्या-न करण्याचा, कारण सांगण्याचा इतरांच्या आयुष्याशी काहीच संबंध नसतो. वेळ नसण्याचं कारण सांगून आपलं क्षणिक समाधान होऊ शकतं पण त्यातून आपलेच नुकसान होते हे आपल्या लक्षात यायला हवं. व्यायामाची शरीराला लागलेली सवय एकाएकी सोडली जाते पण खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या जात नाहीत. त्यामुळे आहारातून घेतलेली अतिरिक्त ऊर्जा कोठेच खर्च केली जात नाही. जिम बंद झाली तरी चालणे, पळणे असे इतर पर्यायही वापरले जात नाहीत मग जीम सोडली आणि वजन वाढलं असं सांगून टाकायचं. बास!

5) मोठी स्वप्न कमीत कमी कालावधीत पूर्ण व्हावीत म्हणून जीममध्ये जाणाऱ्या मुलांना सर्वात मोठा धोका संभवतो तो फुकट सल्ले देणाऱ्यांचा. कधीकाळी जिममध्ये गेलेल्या किंवा न गेलेल्या कोणाचाही सल्ला घेणे अपेक्षित नाही. मसल्स कमवायचे म्हणजे तुला प्रोटिन्सचे डबेच्या डबे संपवावे लागतील, औषधे, गोळ्या, इंजेक्शने घ्यावी लागतील असा कोणी सल्ला जिममध्ये दिला तरी तो तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे असे म्हणावे लागेल. 

6) व्यायाम सुरु करण्यापुर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून सल्ला घेणेच सर्वात महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. तुमचे वजन, उंची, जीवनशैली, कामाचे स्वरुप, आहार याचा विचार करुन कोणता व किती व्यायाम करावा याबाबत तेच सर्वात शास्रशुद्ध मार्गदर्शन करु शकतात. रंगिबेरंगी डब्यांवर पिळदार बाहूंच्या पोरी-पोरांचे फोटो पाहून त्यातल्या पावडरी घ्यायला सुरु करणे जिवावरही बेतू शकते. 

7) त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो व्यायामातील भ्रामक फसव्या संकल्पनांचा. ' नो पेन, नो गेन' सारख्या वेडगळ समजुती सर्वत्र पसरवलेल्या असतात. जीमच्या भिंतींवर किंवा टी-शर्टांवर असली वाक्यं वाचून ते खरंच वाटायला लागतं. व्यायाम करताना वेदना झाल्या मगच खरा व्यायाम आणि त्याशिवाय काहीच फायदा होत नसतो असा समज करुन घेतला जातो. अशा समजापेक्षा धोकादायक काहीच असू शकत नाही. 

8) व्यायाम करताना किंवा केल्यावर अत्यंत वेदना होत असतील किंवा आपल्याला फारच त्रास होत आहे असं वाटत असेल तर ते सहन करण्याऐवजी ती वेळ लगेच डॉक्टरकडे जाण्याची आहे. ओढाताण करुन किंवा दुसऱ्याची कॉपी करुन वेदनादायी व्यायाम करत राहिलो तर कायमस्वरुपी त्रास सहन करावे लागू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या आणि आहारतज्ज्ञांच्या मदतीनेच व्यायामास सुरुवात व सातत्य ठेवणे चांगले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स