मुलांमध्ये भूक न लागण्याचे कारण काय आहे? जाणून घ्या तज्ज्ञांंचं मत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:45 PM2020-09-15T15:45:23+5:302020-09-15T15:49:21+5:30

लहान मुले ही सर्वसाधारणपणे आपल्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी आवश्यक तेवढे खात असतात. बरेचसे पालक मुलांना जबरदस्तीने गरजेपेक्षा जास्त खाऊ घालतात. 

6 Surprising Reasons Kids Refuse to Eat | मुलांमध्ये भूक न लागण्याचे कारण काय आहे? जाणून घ्या तज्ज्ञांंचं मत...

मुलांमध्ये भूक न लागण्याचे कारण काय आहे? जाणून घ्या तज्ज्ञांंचं मत...

googlenewsNext

(Image Credit : livelyeaters.com.au)

डॉ. आरती सोमण, आयुर्वेदिक विशेषज्ञ, निसर्ग हर्ब्स

पालक आपल्या मुलांच्या बाबतीत सतत कोणती ना कोणती चिंता करत असतात. १-५ वर्षे वयोगटातील मुलांचे बरेचसे पालक हे मुलांची भूक कमी झाल्याची किंवा त्यांना खाण्याच्या चुकीच्या सवयी असल्याची समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातात. बाळाचे पहिल्या वर्षातील वजन ६-७ किलोग्रॅमपर्यंत वाढणे आणि त्यानंतर पाचव्या वर्षापर्यंत २ ते ३ किलोग्रॅम्सनी वाढणे पालकांसाठी सवयीचे असते. पण या वयोगटातील मुलांचे वजन कधी कधी तीन-चार महिन्यांत थोडेही वाढत नाही. त्यांची वाढ वेगाने होत नाही. त्यामुळे खाणे मागण्याचे प्रमाण कमी होते व परिणामी मुले कमी खाऊ लागतात किंवा अजिबातच खात नाहीत. या समस्येला फिजिओलॉजिकल अ‍ॅनारॉक्सिया असे म्हणतात. 

लहान मुले ही सर्वसाधारणपणे आपल्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी आवश्यक तेवढे खात असतात. बरेचसे पालक मुलांना जबरदस्तीने गरजेपेक्षा जास्त खाऊ घालतात. 

अनेक पालक दिवसभर आपल्या मुलांच्या पोटात मधल्या वेळचे खाणे, फळे किंवा इतर पदार्थ ढकलत राहतात. पण मूल मागेल तेव्हाच त्याला खाऊ देणे योग्य आहे कारण शरीराला अन्नाची गरज आहे हे जाणवताच त्याची मागणी करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण मुलांकडे उपजतच असते. पुरेशी भूक लागत नसल्याने आपल्या मुलांमध्ये जीवनसत्त्वांची किंवा खनिजांची कमतरता निर्माण होईल अशी चिंताही अनेक पालकांना भेडसावत असते. पण मुलांना जबरदस्ती खायला घातल्यानेही मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो व जेवणाची वेळ त्यांना शिक्षेसारखी वाटू शकते. 

एकदा का तुमचे मूल चमच्याचा वापर करण्याइतके मोठे झाले की पालक म्हणून तुम्ही ते काम पुन्हा कधीही हातात घेऊ नका. तुमच्या मुलांना भूक लागली तर ती स्वत: मागून घेतील. आपल्या मुलांची वजन, उंची नीट वाढतेय ना याची चिंता सोडून द्या. कारण लहान चणीच्या काही मुलांना अन्नाची गरजही तुलनेने कमी असते. 

पण तुमचे मूल वयाने मोठे असेल व त्याची भूक लक्षात येण्याजोग्या प्रमाणात मंदावली असेल, ते सतत थकलेली व चिडचिडी दिसत असतील तर मात्र सावध व्हायला हवे. मुलांच्या खाण्याच्या सवयींत असा बदल होत असेल तर पोटाचा फ्लु, ताप, घसा खबखवणे आणि अतिसार हे आजार त्याला कारणीभूत असू शकतात.  

कौटुंबिक समस्यांमुळे येणारा ताण किंवा अभ्यासात मागे पडणे. 

नैराश्य -  नैराश्यामुळे मुलांच्या भुकेवर खूप परिणाम होतो. 

अ‍ॅनोरेक्सिया नर्व्होसा – मनापासून अन्न खाणे टाळावेसे वाटणे. 

अ‍ॅनिमिया – अ‍ॅनिमिया असलेली मुले आळशी, थकलेली आणि चिडचिडी असतात. 

पोटात कृमी होणे – कृमींमुळे मुलांची भूक कमी होणे, आतड्यांमध्ये रक्तस्त्राव, अतिसार यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.  

बद्धकोष्‍ठता – कोठा नियमितपणे साफ न झाल्यास मुलांच्या भुकेवर परिणाम होऊ शकतो. 

आपल्या मुलांची भूक वाढविण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय उपलब्ध आहेत. पण काहीवेळा आपल्या मुलांनी खायला हवे तितके खावे यासाठी भूक वाढविणारी औषधे देण्याची गरज भासते. अशाप्रकारचे पुरक औषध निवडताना ते उत्पादन अस्सल आणि पुरेशा संशोधनातून सिद्ध झालेले असेल याची काळजी घ्यायला हवी. 

वरील सर्व मुद्दे लक्षात ठेवून आणि सखोल संशोधनातून काही अशा वनौषधी शोधल्या गेल्या आहेत, ज्या सर्वाधिक परिणामकारकतेने मुलांची भूक वाढवू शकण्याच्या कामी समरस होऊ शकतात. या वनौषधी म्हणजे चांगली भूक लागण्यास मदत करणारे तसेच त्या मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे सर्वोत्तम पर्याय आहेत. निसर्ग हर्ब्जमध्ये आम्ही 'इम्युटायझर' सिरप तयार केला आहे, जे संपूर्णपणे शुद्ध वनौषधींपासून बनविलेले पुरक औषध आहे. लहान मुलांसाठी ते अत्यंत सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

घसा खवखवल्यास कोरोनाची भीती न ठेवता; 'हे' घरगुती उपाय वापरून झटपट मिळवा आराम

संशोधकांनी टिपले कोरोना विषाणूबाधित पेशींचे छायाचित्र

coronavirus: ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

Web Title: 6 Surprising Reasons Kids Refuse to Eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.