पुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:19 AM2020-05-29T11:19:26+5:302020-05-29T11:27:31+5:30

पुरूषांच्या आरोग्याबाबत काही फॅक्ट्स सांगणार आहोत. जे प्रत्येकालाच माहित असणं गरजेचं आहे. 

5 things men need to know about their bodies for prevent from disease myb | पुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी

पुरूषांना आपल्या शरीराबाबत माहीत असायलाच हव्यात 'या' ५ गोष्टी

Next

शरीराचा बाहेरून दिसणारा फिटनेस आणि अंतर्गत आरोग्य यात खूप फरक असतो. अनेकदा पुरूष आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात.  त्यांना असं वाटतं की शरीरातील फॅट्स कमी असल्यामुळे ते फिट दिसतात आणि  त्याचं शरीर सुद्धा फिट आहे. पण अनेक समस्या नकळतपणे उद्भवतात. याचं कारण तुमचं आरोग्य चांगलं नसणं हे असू शकतं.  आज आम्ही तुम्हाला पुरूषांच्या आरोग्याबाबत काही फॅक्ट्स सांगणार आहोत. जे प्रत्येकालाच माहित असणं गरजेचं आहे. 

(image credit- healthy balance)

आयएमएस

आयएमएस म्हणजेच मेन्स सिंड्रोम. यामुळे पुरूषांचा मुड सतत खराब होत राहतो. त्यामुळे उदास आणि एकटेपणा असल्याप्रमाणे वाटते. चिडचिड होते, कधी कधी त्यांना असं वाटतं की आपलं अस्तित्व, आपली ओळख धोक्यात येत आहे. आयएमएस या कारणामुळे त्यांच्यात खूप नकारात्मकता आलेली असते. म्हणून सतत असे विचार येतात.

मेल मेनोपॉज

मेनोपॉज साधारणपणे महिलांशी संबंधीत स्थिती समजली जाते. पण विशिष्ट कालावधीनंतर पुरूषांमध्ये सुद्धा मेनोपॉज येतो. यामुळे पुरूषांच्या शारीरिक आणि मानसिक स्थिती बदल होत असतो.पुरूषांमध्ये मेनोपॉजची स्थिती ५० ते ६० या वयोगटात येते. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरात सुद्धा हार्मोन्सच्या बदलांमुळे हा बदल  होतो. कॅल्शियम, व्हिटामीन्स, पोषक आहारातील कमतरता जाणवू लागते. ५० ते ६० या वयात पुरूषांच्या शरीरातील इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झालेलं असतं. म्हणून मेनोपॉज येतो. 

चिडचिड जास्त होणं, एकटेपणा, उदास वाटणं ही स्थिती उद्भवते. या काळात महिलांप्रमाणे पुरुषांना सुद्धा मानसिक आधाराची गरज असते. मेनोपॉजच्या काळात पुरुषांना कॉर्डियोवॅस्कुलर डिजीज, पचनशक्ती मंदावणे, मूड स्विंग्स बदलणं, हाडं कमकुवत होणं अशा समस्यांचा सामना करावा लागतो. 

ऑस्टियोपोरोसिस

महिलांच्या शरीरात साधारणपणे ३० वयानंतर कॅल्शियमची कमी भासू लागते. पुरूषांमध्ये ४५ ते ५० या वयोगटात कॅल्शियमची कमतरता भासते. यावेळी पुरूषांमध्ये हाडांमध्ये दुखणं, मासपेशींमधील वेदना अशा समस्या होतात. त्यासाठी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

प्रोस्टेट कॅन्सर

प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमधील मूत्राशयाच्या खाली असलेल्या पौरुष ग्रंथीचा कर्करोग होय. ही ग्रंथी वीर्य निर्माण करते. या ग्रंथीमध्ये काही समस्या निर्माण झाल्यास वेळोवेळी लघवीला जाण्याची इच्छा होते. वेळीच उपचार न केल्यास प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता वाढते. वाढत्या वयासोबत हा कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढत जातो.  सामान्यपणे प्रोस्टेट ग्रंथींच वजन १८ ग्रॅम असतं, पण याचं वजन ३० ते ५० ग्रॅम झाल्यावर प्रोस्टेट कॅन्सर होतो. ४० वयानंतर ग्लॅडचा आकार वाढू लागतो. 

केस गळणं

केस गळणं ही महिला आणि पुरूषांमध्ये जाणावणारी कॉमन समस्या आहे. केस गळायला लागल्यानंतर अनेक पुरूषांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे नैराश्य येऊन मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो.

CoronaVirus :चीनमध्ये दुसऱ्यांदा कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार; लक्षणांमध्ये होत आहेत 'हे' बदल

कोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल

Web Title: 5 things men need to know about their bodies for prevent from disease myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.