शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्यांना ना ‘मान’, ना ‘धन’!

By admin | Updated: April 24, 2016 02:01 IST

राज्य शासनाने आमदार-खासदारांच्या मानधन व सेवानिवृत्ती वेतनात मोठी वाढ केली आहे. नगरसेवकांनाही बऱ्यापैकी मानधन मिळते.

क्षेत्रभेटीची तुटपुंजी रक्कम : तीन हजारात करावा लागतो मतदार संघातील नागरिकांशी जनसंपर्कप्रशांत देसाई भंडाराराज्य शासनाने आमदार-खासदारांच्या मानधन व सेवानिवृत्ती वेतनात मोठी वाढ केली आहे. नगरसेवकांनाही बऱ्यापैकी मानधन मिळते. मात्र, मिनी मंत्रालयातील सदस्यांना क्षेत्रभेटीसाठी केवळ तीन हजार रूपये दिले जाते. जिल्हा परिषदेचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न शासनाद्वारे केला जात असतानाच जिल्हा परिषद सदस्यांच्या मानधनाची रक्कमही कमी असल्याने या सदस्यांची अवस्था ना ‘मान’, ना ‘धन’ अशी झाली आहे. जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करीत असताना शासनाच्या सर्व योजना आपापल्या मतदारसंघातील गावांमध्ये पोहोचविण्याची धडपड जिल्हा परिषद सदस्य करीत असतात. यामुळे समाजातील शेवटच्या घटकांशी त्यांचा संबंध येत असतो. यातूनच त्यांना सामाजिक प्रश्नांची जाणीव होऊ लागते. जिल्हा परिषदेचे प्रतिनिधीत्व केलेले लोकप्रतिनिधी राज्य व केंद्रीय पातळीवर काम करताना आजही दिसतात, ते यामुळेच. दुर्गम भागातील तालुक्यातील सदस्यांना अन्य सदस्यांनाही विविध कामांसाठी जिल्हा परिषदमध्ये वारंवार यावे लागते. या सदस्यांना दिल्या जाणाऱ्या निधीकडे शासनाने कधीच फारसे लक्ष दिले नाही. पूर्वी आमदार, खासदार एसटीने फिरत असत. त्यांच्यासाठी एसटीमध्ये काही जागा राखीव असत. परंतु त्यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा आणि मानधनात सतत होणारी वाढ यामुळे आता ती परिस्थिती राहिलेली नाही. नगरसेवक शहरातील एका वॉर्डाचे प्रतिनिधीत्व करीत असल्याने त्यांना मिळणारे मानधन किंवा भत्ता बऱ्यापैकी आहे. मात्र, एका जिल्हा परिषद सदस्याला त्यांच्या क्षेत्रात १५ ते २० गावे असल्याने सतत ग्रामस्थांच्या संपर्कात रहावे लागते. परंतु त्यांना क्षेत्रभेटीसाठी केवळ तीन हजार रूपये मिळते. या तुटपुंज्या रकमेत कसरत चालवावी लागते. जिल्हा परिषदमध्ये निवडून आलेल्या सर्वांचीच आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असे नाही. त्यामुळे जिल्हा मुख्यालयापासून दूरवरील सदस्याला कामासाठी जिल्हा परिषदेत यायचे म्हटल्यास बराच खर्च येतो.