शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

गोंडीटोल्यातील नागरिकांचा घरकुलाअभावी संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST

दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात आजही अनेकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. गावातील अनेकजण मोलमजुरी तसेच शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील मोलमजुरी करणारे नागरिक कला राऊत, अनिल राऊत, कुवरलाल राऊत, सुनील राऊत, अज्ञान कोहले, मेहकर नेवारे यांचे आजही घरकुलाअभावी जीर्ण घरात वास्तव्य आहे.

ठळक मुद्देभिंती कोसळलेल्या घरात वास्तव्य : अनेकांची घरकुलांसाठी फरफट

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : तुमसर तालुक्यातील बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोंडीटोला येथे अतिवृष्टीने घर कोसळलेल्या नागरिकांचे धोकादायक घरात वास्तव्य सुरु आहे. जीर्ण घरात वास्तव्य असलेल्या या नागरिकांचा संसार उघड्यावर आला आहे. घरकूल योजनेमध्ये नाव असतानाही लाभ मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत.दीड हजार लोकवस्तीच्या गोंडीटोला गावात आजही अनेकांना घरकुलाची प्रतीक्षा आहे. गावातील अनेकजण मोलमजुरी तसेच शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गावातील मोलमजुरी करणारे नागरिक कला राऊत, अनिल राऊत, कुवरलाल राऊत, सुनील राऊत, अज्ञान कोहले, मेहकर नेवारे यांचे आजही घरकुलाअभावी जीर्ण घरात वास्तव्य आहे. दारिद्र्य व रोजगाराचा अभाव त्यामुळे दररोज घरासाठी संघर्ष सुरु आहे. पोटाकरिता यातील अनेकांची भटकंती सुरु आहे. मात्र गावात आपले हक्काचे घर उभे करण्यासाठी यांना गेल्या काही वर्षापासून संघर्ष करावा लागत आहे. घरकुल योजनेसाठी रितसर ग्रामपंचायतकडे अर्ज केला आहे. त्यांचे नावही मंजूर झाले आहे. मात्र त्यानंतर आजतागायत घरकुल मंजूर झालेले नाही.त्यामुळे आज ना उद्या तरी आपल्याला हक्काचे घरकूल मिळेल या आशेवर त्यांची गुजराण सुरु आहे. घराच्या कोसळलेल्या भिंतीवरच असलेल्या छताखालीच त्यांचे वास्तव्य आहे. मात्र कुटुंबियांसह स्वत:चा जीव धोक्यात घालून राहणाºया या कुटुंबियांकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना परिसरातील लोकप्रतिनिधींचे. धोकादायक घरात वास्तव्य असतानाही ग्रामपंचायतकडून या नागरिकांना कोणतीही सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. गावातील बेघरांना आजही घरकुलासाठी फरफटच सुरु आहे. गावातील सभामंडपात धानाची पोती ठेवण्यात आली आहेत मात्र राहण्यासाठी नागरिकांना सभामंडप उपलब्ध होत नाही. त्यामुळे जीव मुठीत घेऊन वावरणाºया या कुटुंबांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी तरी मदतीचा हात देणार काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. ऐन पावसाळ्यात संततधार पावसात कुटुंबाचा संसार उघड्यावर सुरु आहे. त्यामुळे या नागरिकांना त्वरीत घरकुल मंजूर करून देण्याची गरज आहे.गोंडीटोला येथील सहा कुटुंबियांची नावे घरकुल योजनेच्या प्रतीक्षा निधीत आहेत. मात्र त्यांना तात्काळ मंजूरी देऊन त्यांना आधार देण्याची गरज आहे.-किशोर राहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता बिनाखी.घरकुल प्रतीक्षा यादीत नाव असले तरी आजही जीर्ण घरातच या कुटुंबियांचे वास्तव्य असून या जीर्ण घरात वावरणाºया कुटुंबियांना घरकुलाचा त्वरीत लाभ दिला पाहिजे.-संजय राऊत, ग्रामपंचायत सदस्य, गोंडीटोला.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना