शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी घ्यायची असेल तर आपापल्या क्षेत्रातील लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेवून त्यांना सहकार्य करावे. असे काम करुन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे प्रतिपादन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.

ठळक मुद्देसहषराम कोरोटे : जिल्हा काँग्रेस कमिटीने केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मला आमदारकीच्या निवडणुकीत भरपूर आशिर्वाद देऊन जनतेने विधानसभेत पाठविले. त्यामुळे मला खऱ्या अर्थाने त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे अधिकार मिळाले. अशाचप्रकारे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी घ्यायची असेल तर आपापल्या क्षेत्रातील लोकांच्या अडीअडचणी लक्षात घेवून त्यांना सहकार्य करावे. असे काम करुन काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येत्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे प्रतिपादन आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी (दि.१८) आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. याप्रसंगी सत्कारमुर्ती आमदार सहषराम कोरोटे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव योगेंद्र भगत, जिल्हा उपाध्यक्ष पी.जी.कटरे, अनिल गौतम, जिल्हा महासचिव रत्नदीप दहिवले, आमगाव तालुकाध्यक्ष नटवरलाल गांधी, सालेकसा तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, तिरोडा तालुकाध्यक्ष राधेलाल पटले, गोरेगाव तालुकाध्यक्ष देवेंद्र रहांगडाले, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, आमगाव तालुका महिलाध्यक्ष उषा भेंडारकर, महिला सामाजिक कार्यकर्ता सीमा कोरोटे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने नवनिर्वाचित आमदार कोरोटे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून पक्षाचे जिल्हाध्यक्ष कटरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रदेश महासचिव भगत यांनी मांडले. संचालन करून आभार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष आलोक मोहंती यांनी मानले.

टॅग्स :Electionनिवडणूक