वन विभागाच्या नाक्यावरून लाकडाची तस्करी

By Admin | Updated: December 25, 2015 02:28 IST2015-12-25T02:28:15+5:302015-12-25T02:28:15+5:30

तिरोडा-खैरलांजी राज्य मार्गावर वैनगंगा नदीकाठावरील पुजाजवळ बोंडरानी (अर्जुनी) येथे असलेली वनविभागाची चौकी नाममात्र झाली आहे.

Wood smuggling from the wreckage of forest department | वन विभागाच्या नाक्यावरून लाकडाची तस्करी

वन विभागाच्या नाक्यावरून लाकडाची तस्करी

गाड्यांच्या नोंदी नाही : कर्मचारी राहतात नशेत
परसवाडा : तिरोडा-खैरलांजी राज्य मार्गावर वैनगंगा नदीकाठावरील पुजाजवळ बोंडरानी (अर्जुनी) येथे असलेली वनविभागाची चौकी नाममात्र झाली आहे. या चौकीवर लाकडांनी भरून येणाऱ्या प्रत्येक मालवाहतुक गाडीची तपासणी करून डायरीत वाहन क्रमांकासह त्यातील मालाची नोंद घेणे आवश्यक आहे. मात्र येथे मालवाहक ट्रक-ट्रॅक्टरची नोंद घेतलीच जात नाही.
वनाधिकारी आणि कर्मचारी तसेच वनतस्करांचे साटेलोटे असल्यामुळे मालाने भरून जाणाऱ्या वाहनांची नोंद घेतली जात नसली तरी रिकाम्या जाणाऱ्या मालगाडीची नोंद मात्र केली जाते. हा प्रकार कुंपनानेच शेत खावे असा झाला आहे. या चेकपोस्ट आठ तासाची एका गार्डची ड्युटी असते. आळी-पाळीने तीनही गार्ड घरगुती कामासाठी जातात. सागवान व अन्य मौल्यवान लाकडांची तपासणी केली जात नाही. पोलीस पेट्रोलिंगसाठी येतात, कोणी सापडले तेच त्यांचे, पण वनकर्मचारी त्यांनाही सतर्क करतात आणि पोलीस नाक्यावर असल्याची माहिती आधीच वनतस्करांना मिळते. मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात बांबूचे लाकूड येत असते. मध्यप्रदेशात वृक्ष कापणीवर बंदी असली तरी चोरट्या मार्गाने लाकूड महाराष्ट्राच्या सिमेत पाठविले जाते. (वार्ताहर)

Web Title: Wood smuggling from the wreckage of forest department