शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

सोशल मीडियावरून होणार महिलांच्या समस्यांचे निवारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:00 AM

मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बैठकीबाबत) नियम १९५९ मधील कलम (७) अन्वये ग्रामसभा घेण्याबाबत तरतूद आहे. या ग्रामसभेच्या आयोजनापूर्वी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात येते. परंतु सद्यस्थिीतीत कोविड-१९ आजाराने थैमान घातले आहे. या आजाराच्या पार्श्वभुमीवर कोविड आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणावर नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी ग्रामसभा नाही : व्हाट्सअ‍ॅप, ईमेल व मोबाईलचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गावातील महिलांच्या समस्या गावातीलच ग्रामसभेत सोडविल्या जायच्या. परंतु यंदा कोरोने थैमान घातल्याने यंदा ग्रामसभा होणार नाहीत असे चित्र स्पष्ट असताना महिलांच्या गाºहाणी, तक्रारी सोडविण्यासाठी शासनाने नवीन शक्कल लढविली आहे. मोबाईल, ईमेल व व्हाट्सअ‍ॅपवर महिलांच्या तक्रारी मागवून त्या तक्रारी सोडविण्याचे निर्देश ग्रामविकास मंत्रालयाने दिले आहे. जिल्ह्यातील ५४५ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या समस्या आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहेत.मुंबई ग्रामपंचायत (ग्रामसभेच्या बैठकीबाबत) नियम १९५९ मधील कलम (७) अन्वये ग्रामसभा घेण्याबाबत तरतूद आहे. या ग्रामसभेच्या आयोजनापूर्वी विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्यात येते. परंतु सद्यस्थिीतीत कोविड-१९ आजाराने थैमान घातले आहे. या आजाराच्या पार्श्वभुमीवर कोविड आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणावर नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. यासाठी राज्यात ग्राम पातळीवर घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर महिला ग्रामसभा देखील आयोजित करता येणार नाही.ग्रामसभा पंचायतराज व्यवस्थेचे अविभाज्य अंग आहे. ग्रामसभेद्वारे गावपातळीवरील नागरिकांच्या विविध समस्या व शासन योजनांची प्रभावी अंमलबजावणी, संनियंत्रण होत असते. विशेष महिला ग्रामसभेच्या अनुषंगाने गावातील प्रश्नांबाबत तसेच त्यांच्या अडचणीबाबत महिला ग्रासभेत सक्रीय सहभाग दर्शवित असतात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ग्रामसभा घेता येणार नाही. मात्र ग्रामसभेच्या आयोजनाअभावी महिलांच्या तक्रारी, अडचणींचे निवारण करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी ग्राम पातळीवर डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून व्हाट्सअ‍ॅप, ईमेल व फोन या साधनांच्या माध्यमातून संबधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी यांनी महिलांच्या तक्रारी, अडचणी प्राप्त करून त्यांचे निराकरण करणार आहेत.तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकारी कर्मचारी यांनी संबधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, अधिकारी व महिला प्रतिनिधींशी संपर्क साधून गाव पातळीवर येणाºया अडचणींचे व समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.गोंदिया जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायत असून अर्जुनी-मोरगाव ७०, सडक-अर्जुनी ६३, गोरेगाव ५५, देवरी ५५, सालेकसा ४१, आमगाव ५७, तिरोडा ९५, गोंदिया तालुक्यात १०९ ग्रामपंचायत आहेत. या सर्व ग्रामपंचायतमधून आधी महिलांच्या तक्रारी मागवून त्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.केंद्र व राज्य सरकारने स्वातंत्र्यदिनानिमित्त दिलेल्या सूचनांचे पालन जिल्ह्यात केले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी काय-काय करावे यासंदर्भात दिलेल्या सूचनांचे सर्व ग्रामपंचायती पालन करणार आहेत.- नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) जि.प.गोंदिया.कोविड काळात कार्य करणाऱ्यांचा सत्कारयंदा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने कोविडच्या कामात रात्रंदिवस राबणाºया कोविड योध्दांचा सत्कार स्वातंत्रदिनी करावा असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. त्यामुळे गाव, तालुका, जिल्हा पातळीवर ध्वजारोहणानंतर कोविड योध्दांचा सत्कार फिजिकल डिस्टन्स ठेवून करण्यात येणार आहे.

टॅग्स :Womenमहिला