लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षत्रलग्रस्त क्षेत्र म्हणून मतदानाच्या टक्केवारीला घेऊन संभ्रम असलेल्या व दुपारी ३ वाजतापर्यंत मतदान घेण्यात आलेल्या अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघांतच विक्रमी ७० टक्केच्या घरात मतदान दिसून येत आहे. त्यातही विशेष बाब म्हणजे, दोन्ही मतदारसंघातील महिलांनी ‘हम किसी से कम नही’ दाखवून देत चक्क ७० टक्के मतदान केले आहे. यातून नक्षलग्रस्त भागातील महिला पुरूषांपेक्षा अग्र्रेसर दिसल्या.जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येते. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया घेतली जाते. नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे जिल्हा प्रशासन या दोन्ही मतदारसंघांत चोख बंदोबस्त लावून मतदारांची सोय करते. त्यातही किती मतदान होणार याबाबत सांगणे कठीण असते. मात्र आश्चर्याची बाब अशी की, याच नक्षलग्रस्त विधानसभा मतदारसंघांत सर्वाधिक ७० टक्केच्या घरात मतदान झाल्याची नोंद झाली आहे.अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात दोन लाख ५२,५९१ मतदार असून त्यात एक लाख २७ हजार १०२ पुरूष, एक लाख २५ हजार ४८८ महिला व एक तृतीयपंथी मतदार आहे. तर आमगाव विधानसभा मतदार संघात दोन लाख ६६ हजार ५३० मतदार असून त्यात एक लाख ३३ हजार ३९७ पुरूष व एक लाख ३३ हजार १३३ महिला मतदार आहेत. यात अर्जुनी-मोरगाव मतदारसंघात ८६ हजार हजार ७५६ पुरूषांनी मतदानाचा हक्का बजावला असतानाच ८८ हजार १७९ महिलांनी मतदान केले. म्हणजेच, ६८.२६ टक्के पुरूषांचे मतदान असतानाच ७०.२७ टक्के महिलांनी मतदान केले आहे.तर आमगाव विधानसभा मतदारसंघात ८९ हजार २७३ पुरूषांनी मतदान केले असतानाच ९२ हजार ७६३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे, सुरक्षीत समजल्या जाणाऱ्या तिरोडा व गोंदिया मतदारसंघातील महिलांची टक्केवारी कमी असतानाच नक्षलग्रस्त भागातील महिला पुरूषांपेक्षा अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे.तृतीयपंथीयांचीही मतदानाकडे पाठजिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात एक तर तिरोडा विधानसभा मतदारसंघात चार अशा प्रकारे एकूण पाच तृतीयपंथी मतदार जिल्ह्यात असल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र यातील अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावलेला नाही. तर तिरोडा मतदारसंघातील चार पैकी फक्त एकाच तृतीयपंथी मतदाराने मतदानाचा हक्क बजावला आहे. यातून तृतीयपंथीयांनीही मतदानाकडे पाठ फिरविल्याचे दिसले.रिंगणातून नाही तर मतदानातूनदाखविली ताकतविधानसभेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील चार मतदारसंघांतून फक्त एकच महिला देवरी विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरली होती.यावरून निवडणुकीत महिलांचा जोर कमी असल्याचे दिसत होते. मात्र नक्षलग्रस्त भागातील या दोन विधानसभा मतदारसंघांतील महिलांनी मतदानाची आश्चर्यजनक टक्केवारी देत आपली ताकत दाखवून दिली. महिलांनी रिंगणात नसतानाही अन्य उमेदवारांच्या नशिबाची चाबी आपल्या हातात असल्याचे मात्र दाखवून दिले.
नक्षलग्रस्त भागातील महिलाच अग्रेसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 06:00 IST
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील अर्जुनी-मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येते. यामुळे या दोन्ही मतदारसंघांत दुपारी ३ वाजतापर्यंत मतदानाची प्रक्रिया घेतली जाते. नक्षलग्रस्त क्षेत्र असल्यामुळे जिल्हा प्रशासन या दोन्ही मतदारसंघांत चोख बंदोबस्त लावून मतदारांची सोय करते. त्यातही किती मतदान होणार याबाबत सांगणे कठीण असते.
नक्षलग्रस्त भागातील महिलाच अग्रेसर
ठळक मुद्दे७० टक्के मतदान : पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे