रेल्वेच्या धडकेत महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:30 AM2021-05-27T04:30:35+5:302021-05-27T04:30:35+5:30

या अनोळखी महिलेचे वय अंदाजे ६०-६५ वर्ष असून उंची अंदाजे ५ फूट ४ इंच, रंग सावळा, केस पांढरे, ...

Woman killed in train crash | रेल्वेच्या धडकेत महिला ठार

रेल्वेच्या धडकेत महिला ठार

Next

या अनोळखी महिलेचे वय अंदाजे ६०-६५ वर्ष असून उंची अंदाजे ५ फूट ४ इंच, रंग सावळा, केस पांढरे, दोन्ही हात व पायाची नखे वाढलेली आहेत. महिलेने अंगावर पोपटी रंगाची साडी, लाल रंगाचे ब्लाऊज घातले असून डाव्या हातात पिवळसर रंगाचे प्लास्टिकचे तीन बाजारू कंगन, दोन्ही हाताचे मनगट यामध्ये हिरवा धागा, गळ्यात पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या दोन माळ, गळ्यात पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या फुलांची हार तसेच झेंडूच्या वाढलेल्या फुलाचे हार असून प्रथम दर्शनी पाहता ही महिला वेडसर असल्याचे दिसून आहे. या वर्णनाच्या महिलेची ओळख व माहिती आणि पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला पोलीस विभागाकडून बक्षीस देण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव तोदले यांनी कळविले आहे. अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाच्या वर्णनावरून तिची ओळख व माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरचे पोलीस निरीक्षक तोदले यांनी केले आहे.

Web Title: Woman killed in train crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.