अपेक्षाभंग होऊ देणार नाही

By Admin | Updated: December 6, 2015 01:44 IST2015-12-06T01:44:50+5:302015-12-06T01:44:50+5:30

अपंग सेवा हिच ईश्वरसेवा असून आज मला तुमच्या रुपाने ईश्वराचा साक्षात्कार झाला असून आपल्या मागण्यांचे निवेदन ...

Will not be disappointing | अपेक्षाभंग होऊ देणार नाही

अपेक्षाभंग होऊ देणार नाही

संजय पुराम : जिल्हास्तरीय अपंग मेळावा थाटात
आमगाव : अपंग सेवा हिच ईश्वरसेवा असून आज मला तुमच्या रुपाने ईश्वराचा साक्षात्कार झाला असून आपल्या मागण्यांचे निवेदन हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवणार आहे. तुम्हाला माझ्याकडून असलेल्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. गुरूवारी (दि.३) येथे आयोजित जिल्हास्तरीय अपंग मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगाराचे व्यवस्थापक गौतम शेंडे, समाजकल्याण विभागाचे मिलिंद रामटेके , अपंग कर्मचारी संघटनेचे सचिव ओमप्रकाश बिसेन, पंचायत समिती सदस्य छबु उके, अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर बन्सोड, मनोहर डोंगरे, निर्मला रामटेके, शोभेलाल भोंगाडे, आकाश मेश्राम, दिनेश पटले, विनोद शेंडे, राखी चुटे प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. या मेळाव्यात अपंग युवक-युवती मोठ्या संख्येत सहभागी झाल्या होत्या. तर सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत अपंगांनी ‘बेरोजगारी’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण केले. संचालन पुरुषोत्तम कावळे यांनी केले. प्रास्ताविक शामसुंदर बन्सोड यांनी मांडले. आभार कल्पना बन्सोड यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Will not be disappointing