शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आपले मित्र व शत्रू कोण? याचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

पोवार समाजाच्यावतीने शास्त्री वॉर्डातील यशोधरा सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्र मात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. उदघाटन अ‍ॅड. भगवती तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सीता रंहागडाले होत्या.

ठळक मुद्देविमल कटरे : शास्त्री वॉर्डात महिलादिन उत्साहात साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संस्कृतीच्या नावावर महिलांना चारभितींच्या आत राहावे अशी परंपरा या देशातील काही विशिष्ट लोकांनी तयार करून समाज घडविण्याची क्षमता असलेल्या महिलांनाच अबला बनविण्याचेही काम केले आहे. आता मात्र आपण सावित्रीबाई, जिजाऊ, रमाईच्या विचारांनी आपल्यात बदल घडवून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. आपले शत्रू कोण व मित्र कोण याचा विचार करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सालेकसा तालुका महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष विमल कटरे यांनी केले.येथील पोवार समाजाच्यावतीने शास्त्री वॉर्डातील यशोधरा सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्र मात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. उदघाटन अ‍ॅड. भगवती तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सीता रंहागडाले होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून एक्वायर पब्लिक एज्युकेशन सोसायटीच्या कोषाध्यक्ष मिनाक्षी कटरे व दिव्या भगत (पारधी) उपस्थित होत्या. पुढे बोलताना कटरे यांनी, मुलींची पहिली शाळा सुरु करुन सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच आम्ही शिक्षित होऊन समाजात वावरण्या योग्य झालो असलो तरी सावित्रीबाईंच्या विचारांचा अंगीकार मात्र न केल्यानेच पुन्हा महिलांवर या दशकात गुलामिगरीत जाण्याची वेळ येऊ घातली असल्याचे सांगीतले. आमच्या अधिकारासाठी आमच्या ओबीसी समाजाची जनगणना होणे गरजेचे आहे.यासाठी जो लढा सुरू आहे, त्या लढ्यात प्रत्येक महिलेने कुटुंबप्रमुख म्हणून सहभागी होऊन आमची जनगणना नाही तर आमचा जनगणनेवर बहिष्कार हा ब्रिद मनात ठासून घ्यायचा असल्याचे विचार व्यक्त केले.तुरकर यांनी, आम्हा महिलांना पुरुषांच्या बरोबर जगण्याचे अधिकार, वारसाहक्क, पतीच्या सपंत्तीत अधिकार हे भारतीय संविधानाने दिले असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. संचालन आशू रहागंडाले, स्नेहा गौतम व नूतन बिसेन यांनी केले. आभार आशू रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी पोवार समाज महिला समिती अध्यक्ष संगिता रंहागडाले, संयोजिका गीता चौधरी, सचिव आशा रंहागडाले, माधुरी कटरे, भूमिका राणे, अंजू चौधरी, शितल बिसेन, रेखा पारधी, कविता ठाकरे, सुनिता रहागंडाले, गायत्री कटरे, भूमेश्वरी बिसेन, नीता तुरकर, रीता कटरे, पुष्पा अंबुले, ओमलता कटरे, भूमेश्वरी पारधी, कविता रहागंडाले, रीता चौधरी, माधवी गौतम व शांता पारधी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक