शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

खून झालेल्या ‘त्या’ दोन महिला कोण?

By admin | Updated: February 2, 2016 01:37 IST

गोरेगाव तालुक्यातील जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा खून करून त्यांचा मृतदेह जंगलात ..

माहिती देणाऱ्यास बक्षीस : सहा महिन्यानंतरही सुगावा नाहीगोंदिया : गोरेगाव तालुक्यातील जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांचा खून करून त्यांचा मृतदेह जंगलात टाकण्याच्या घटना गेल्या ८ जुलै २०१५ व १४ आॅक्टोबर २०१५ रोजी उघडकीस आल्या होत्या. परंतू गेल्या त्या दोन्ही महिलांची ओळख पटविण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे या प्रकरणांचा तपास खोळंबला आहे. गोरेगाव पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस त्या महिलांची ओळख पटविण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या लढवित आहेत. आता त्यासाठी बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तिल्ली-मोहगावच्या जंगल परिसरात ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास २० ते ३० वर्षाच्या वयोगटातील महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. तिच्यावर अतिप्रसंगही झाला आहे. पाच फूट उंचीची, रंग गोरा, हातात चांदीची अंगठी, गळ्यात मंगळसूत्र परिधान केलेल्या महिलेची ओळख आतापर्यंत पटली नाही. तिची ओळख पटल्यानंतर आरोपीपर्यंत जाणे पोलिसांना सोयीस्कर होणार आहे.दुसरी घटना सुर्यादेव मांडोदेवी जंगल परिसरातील आहे. २० ते ३० वर्षाच्या महिलेचा खून करून तिचा मृतदेह तलावातील पाण्यात टाकण्यात आला होता. ही घटना १४ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली. तिच्यावरही बळजबरी झाली असावी. त्या महिलेची उंची पाच फूट, रंग गोरा, मजबूत बांधा आहे. परंतु याही महिलेची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे या घटनेतील आरोपीपर्यंत पोलिसाना पोहचता आले नाही. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसही या दोन्हीे घटनातील मृत महिलांची ओळख पटविण्याच्या कामाला लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)माहिती देणाऱ्यास पुरस्कारगोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या या दोन महिलांच्या खुनातील आरोपींना पकडता यावे यासाठी मृत महिलांची ओळख करणे आवश्यक आहे. या घटनेतील महिला आपल्या जिल्ह्यातील नसल्या तरी आरोपी जिल्ह्यातीलच असावा, कारण जंगलात एवढ्या आत जाणे बाहेरच्या व्यक्तीसाठी अशक्य आहे. त्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सुगावा लागावा म्हणून गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी या घटनेची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याचे ठरविले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही रणवरे यांनी सांगितले.